कोरोना काळात सहकुटुंब निरोगी राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ 4 सोप्या टिप्स; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा सामान्य जीवनावर व्यापक परिणाम झाला आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात लसीकरण सुरू आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) चे संचालन संशोधन गटाचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र अरोरा यांनी म्हटले की, कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी घरातून बाहेर पडताना डबल मास्क घाला. सोबत सामाजिक अंतराचे पालन करा आणि कोरोना लस आवश्य घ्या. यामुळे धोका कमी होतो. याशिवाय, कोरोना काळात सहकुटुंब निरोगी राहण्यासाठी सोप्या टिप्स आवश्य फॉलो करा…

1 हायड्रेट रहा
आजारांपासून वाचण्यासाठी भरपूर पाणी प्या. हायड्रेट रहा. डॉक्टर्ससुद्धा रोज 3-4 लीटर पाणी पिण्याचा सल्ला देतात.

2 सावधगिरी बाळगा
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी नेहमी मास्क घाला. आवश्यकता असेल तर घरातसुद्धा मास्क घाला. सामाजिक अंतर पाळा. नियमित हात धुवा. कोरोना व्हॅक्सीन आवश्य घ्या.

3 संतुलित आहार
कोरोना काळात इम्यून सिस्टम मजबूत ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्या. आहारात व्हिटॅमिन-सी, फायबर आणि प्रोटीनयुक्त फळे आणि भाज्या आवश्य सेवन करा.

4 रोज एक्सरसाइज करा
कुटुंबातील सदस्यांना एक्सरसाइज करण्याचा सल्ला द्या. सर्वांनी रोज एक्सरसाइज करा. तसेच रोज ध्यान आणि योग सुद्धा करा.