2021 मध्ये निरोगी राहण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींवर आवश्य लक्ष द्या, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधुनिक काळात निरोगी राहणे मोठे आव्हान आहे. यासाठी लाईफस्टाइल आणि खाणेपिणे यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 2020मध्ये कोरोनामुळे आरोग्याचे मोठे संकट निर्माण झाले होते. यामध्ये प्रचंड नुकसान देखील झाले. आता 2021 नवीन आशा आणि अपेक्षा घेऊन आले आहे. या वर्षात निरोगी आरोग्याचा संकल्प आवश्य करा. यासाठी या 5 टिप्स फॉलो करू शकता…

1 आरोग्याला गांभिर्याने घ्या
डाएटचा थेट आरोग्याशी संबंध असतो. तुम्ही जो डाएट घेता त्याचा चांगला-वाईट परिणाम शरीरावर होतो. डाएटमध्ये केवळ त्या गोष्टी जोडा ज्या आवश्यक आहेत. यामुळे आजारापासून तुम्ही दूर राहू शकता. प्रत्येक पदार्थात मसाल्यांचा वापर करू नका, कारण यामुळे इम्युनिटी कमजोर होते आणि सूज सुद्धा होते. नैसर्गिक तेल आणि मसाल्यांचा वापर करा.

2 पसंतीचे पदार्थ खा
निरोगी आणि प्रसन्न राहण्यासाठी आवश्यक आहे की, तुमच्या पसंतीचे पदार्थ खा. जर पिझ्झा किंवा बर्ग खायचा आहे, तर आवश्य ट्राय करा, मात्र तो घरी बनवला तर जास्त चांगले ठरू शकते. बाहेर खात असाल तर केवळ ब्रँडयुक्त पदार्थ खा.

3 मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या
हळद इम्यून बूस्टरसह मानसिक आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. यामध्ये करक्यूमिन आढळते, ज्यास जादुई तत्व म्हटले जाते. यामुळे बुद्धी तीष्ण होते. तज्ज्ञांनुसार, नेहमी ऑमलेट, पोहा, उपमा यामध्ये एक चिमुट हळद आवश्य टाका. मात्र, हे आवश्यक आहे की, हळदीत किमान 3 टक्के करक्यूमिन आवश्य असावे. सोबतच हळदीच्या दुधाचे सेवन करा.

4 डाएटमध्ये चांगल्या वस्तूंचा वापर करा
यासाठी डाएटमध्ये खिचडी, दलिया इत्यादींचे सेवन करा. याकरिता कडधान्यांचाच वापर करा. पॅक्ड दलिया ब्रँडेड घ्या. एका आठवड्यात किमान दोन वेळा खिचडीचे सेवन करा.

5 हॅप्पी फूड खा
चन्याला हॅप्पी फूड मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-बी1, थायमिन आढळते, जे मेंदू आणि नर्व्हस सिस्टमसाठी लाभदायक ठरते. फोलेट आणि पायरीडॉक्सीन सुद्धा आढळते, जे मूड कंट्रोल करते. यामुळे शरीरात हॅप्पी हार्मोन सेरोटोनिन-नोरेपेनेफ्रिन उत्सर्जित होते. यासाठी आपल्या डाएटमध्ये चन्याचा आवश्य समावेश करा.