समर सीझनमध्ये शुगर कंट्रोल करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मधुमेह रोगात शुगर कंट्रोल करणे अवघड टास्क असतो. विशेष करून उन्हाळ्यात हे मोठे आव्हान असते. मधुमेहाच्या रूग्णाने उन्हाळ्यात खाण्यापिण्याकडे कोटेकोर लक्ष दिले पाहिजे. तुम्ही सुद्धा डायबिटीजचे रूग्ण आहात आणि उन्हाळ्यात शुगर कंट्रोल करायची असेल, तर या टिप्स आवश्य फॉलो करा-

1 हायड्रेट रहा
उन्हाळ्यात हायड्रेट रहा. यासाठी दारू, कोल्ड ड्रिंक्स, चहा-कॉफीचे सेवन करू नका. जास्तीत जास्त पाणी प्या.

2 उन्हापासून दूर रहा
तज्ज्ञांनुसार, डायबिटीजच्या रूग्णांनी उन्हापासून दूर रहावे. यामुळे शुगर कंट्रोल राहते.

3 शुगर तपासा
उन्हाळ्यात शुगर कंट्रोल करण्यासाठी नियमित अंतराने चाचणी करा. घाम येणे, डोकेदुखी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांकडे जा.

4 एक्सरसाईज करा
लोक उन्हाळ्यात उष्णता आणि आद्रतेमुळे एक्सरसाईज टाळतात. पण असे करू नका. रोज सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम करा.

5 औषध घ्या
कोणतेही औषध स्किप करू नका. रोज वेळेवर संतुलित आहार आणि औषघे घ्या. यामुळे शुगर नियंत्रणात राहील.