वजन वाढवण्यासाठी दररोज ‘या’ नियमांचं पालन करणं गरजेचं, एकाच आठवडयात दिसेल ‘परिणाम’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   एकीकडे जिथे काही लोक वाढत्या वजनाने त्रस्त आहेत. दुसरीकडे, काही लोक बारीक शरीरयष्टीने त्रस्त आहेत. यासाठी, ते दिवसभर खातात आणि कठीण परिश्रम घेतात. असे असूनही त्यांचे वजन वाढत नाहीत. बारीक होण्याची अनेक कारणे आहेत, त्यात मुख्य म्हणजे आपला आहार. जर तुम्ही नियमितपणे संतुलित आहार घेत नसाल तर तुमचे वजन कमी होऊ लागते. म्हणून वर्कआउट्ससह आपल्या आहाराकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यासह वजन वाढविण्यासाठी काही नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. आपणही बारीक शरीरयष्टीने त्रस्त असल्यास आणि वजन वाढवू इच्छित असल्यास, या नियमांचे अनुसरण करा –

– जर आपल्याला वजन वाढवायचे असेल तर आपल्या आहारात दररोज 500 कॅलरी जोडा. यासाठी आपण केळीचे सेवन करू शकता. केळीमध्ये 100 कॅलरी असतात. जर आपण आठवड्यातून दररोज 500 कॅलरी घेत असाल तर आठवड्यात आपले वजन 500 ग्रॅम वाढू शकते. अशा प्रकारे आपण केवळ एका महिन्यात दोन किलो वजन वाढवू शकता. दरम्यान, हे शरीर रचना, उंची आणि वजन यावर अवलंबून असते.

–  वजन वाढवण्यासाठी लोक जास्त खातात. या संदर्भात त्यांचे म्हणणे आहे की, पोट भर अन्न खाल्ल्याने शरीरास लागते, मात्र ही विचारसरणी चुकीची आहे. एकाच वेळी अधिक खाल्ल्याने वजन वाढत नाही, उलट वजन वाढवण्यासाठी दिवसातून तीन ते चार वेळा खाणे महत्वाचे आहे. छोटासा आहार ठेवा, परंतु दिवसातून तीन ते चार वेळा खा.

–  भरपूर पाणी प्या. हे आपले शरीर हायड्रेटेड आणि पाचक प्रणाली मजबूत ठेवेल. आपण इच्छित असल्यास, आपण पाण्यात लिंबू आणि साखर देखील मिसळून पिऊ शकता. दरम्यान, योग्य प्रमाणात ते घ्या.

–  नियमितपणे स्क्वॅट्स, पुल अप्स, ओव्हरहेड प्रेस, बेंच प्रेस व्यायाम करा. यासाठी आपण सुरुवातीला 5 -5 सेट मारू शकता. कधीही दबावाखाली व्यायाम करू नका, त्याऐवजी दररोज छोट्या छोट्या सेटमध्ये करा.