कोरोना काळात नवजात बाळाच्या देखभालीसाठी या 16 टिप्स करा फॉलो, जाणून घ्या

नवी दिल्ली :वृत्त संस्था – देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू आहे. अशावेळी तज्ज्ञ सांगतात की, आपली आणि आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. विशेषकरून नवजात बाळांच्या देखभालीसाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गाईडलाईन्स आवश्य फॉलो करा. कोरोना काळात नवजात बाळाची देखभाल कशी करावी ते जाणून घेवूयात…

1 – नवजात बाळाची खोली चांगल्या प्रकारे डिसइन्फेक्ट करा.
2 – आई आणि बाळाने दोघांनी घरात राहण्याची आवश्यकता आहे.
3 – शारीरीक अंतर राखा.
4 – घरात लहान मुले असतील तर त्यांना नवजात बाळापासून दूर ठेवा.
5 – पाच वर्षापेक्षा लहान बाळांना मास्क घालण्याची आवश्यकता नाही.
6 – स्तनपान करताना आईने मास्क घालावा. स्वच्छता ठेवावी.
7 – आईने ठराविक कालावधीनंतर आपले हात स्वच्छ करत रहावे.
8 – हात धुताना साबण आणि सॅनिटायजरचा वापर करा.
9 – स्तनपान करण्यापूर्वी सॅनिटायजरने हात डिसइन्फेक्ट करा.
10 –  आईने संक्रमित होण्याची चिंता करू नये. यामुळे आरोग्यावर प्रतिकुल परिणाम होतो.

स्वताची काळजी घ्या
11 – रोज किमान 7 ते 8 तास झोप घ्या.
12 – रोज 30 मिनिटे एक्सरसाईज करा. विशेषकरून ब्रिस्क वॉकिंग, योग आणि मेडिटेशन करा.
13 – हृदय निरोगी ठेवण्यासाठी वसा आणि मीठाचे कमी सेवन करा. फायबरचे जास्त सेवन करा.
14 – शरीर हायड्रेट ठेवा. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्यप्रमाणात पाणी प्या.
15 – नियमित वेळेवर संतुलित आहार घ्या.
16 -नियमित अंतराने मेडिकल चेक-अप करा.