28 एप्रिलपासून 18+ वयाचे लोक घेऊ शकतील व्हॅक्सीन, जाणून घ्या रजिस्ट्रेशनसह कोणते कागदपत्र असतील आवश्यक

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात 18 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना व्हॅक्सीनसाठी रजिस्ट्रेशन 28 एप्रिलपासून सुरू होईल. व्हॅक्सीनचा डोस घेण्यासाठी को-विन पोर्टलद्वारे रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते. सरकारने 1 मेपासून 18 आणि यापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. को-विन अ‍ॅपवर रजिस्ट्रेशननंतर लोकांना लस दिली जाईल. कशा प्रकारे को-विनवर रजिस्ट्रेशन करावे ते जाणून घेवूयात…

रजिस्ट्रेशन कसे होईल ?
* आरोग्य सेतु अ‍ॅप आणि कोविन पोर्टल (cowin.gov.in) वर रजिस्ट्रेशन होईल.
* मोबाइल नंबर ओटीपीद्वारे व्हेरिफाय करावा लागेल.
* आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा एखाद्या अन्य फोटो आयडीच्या आधारावर माहिती सबमिट करावी.
* पिनकोड टाकून व्हॅक्सीनेशन साईट, तारीख आणि वेळ निवडावा लागेल.
* एका मोबाइल नंबरवरून 4 रजिस्ट्रेशन होऊ शकतील.

वॉक-इनची सुविधा कुठे मिळेल?
सरकारी आणि प्रायव्हेट व्हॅक्सीनेशन सेटर्सवर वॉक-इनची सुविधा आहे. कुणीही व्यक्ती आपले फोटो ओळखपत्र देऊन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करून व्हॅक्सीनचा डोस घेऊ शकतो.

हे कागदपत्राचे पर्याय
– आधार कार्ड
– वोटर आयडी
– पासपोर्ट
– ड्रायव्हिंग लायसन्स
– पॅन कार्ड
– हेल्थ इन्श्युरन्स स्मार्ट कार्ड
– पेन्शन डॉक्युमेंट
– बँक/पोस्ट ऑफिस पासबुक
– मनरेगा जॉब कार्ड
– एमपी/एमएलए/एमएलसी यांचे आयडी कार्ड
– सरकारी कर्मचार्‍याचे सर्व्हिस आयडी कार्ड
– नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत जारी स्मार्ट कार्ड