Immunity Boosting Herbs : कोरोना व्हायरसपासून बचाव करेल आवळा आणि शेवग्याच्या पानांपासून बनवलेले ड्रिंक, जाणून घ्या रेसिपी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपासून रक्षण करण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी लोक विविध प्रकारचे उपाय करत आहेत. सामाजिक अंतर राखणे, मास्क घालणे यासह आहाराकडे विशेष लक्ष देत आहेत. आयुर्वेदानुसार आवळा आणि शेवग्याचा ज्यूस सुद्धा तुमची इम्युन सिस्टम व्यवस्थित ठेवू शकतो. याचे फायदे आणि कृती जाणून घेवूयात…

आवळ्याचे गुण :
1 इम्युन सिस्टम चांगली राहते.
2 व्हिटॅमिन सी भरपूर असते.
3 सफेद रक्तपेशी वाढतात
4 इन्फेक्शनशी लढण्यास मदत होते.
5 यात कॅल्शियम, आयर्न, फॉस्फोरस, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, प्रोटीन आणि कार्ब्स असतात.
6 रक्त स्वच्छ होते.
7 शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात.

शेवग्याच्या पानांचे गुण :
1 यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते
2 अँटीऑक्सिडेंट, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात
3 इम्यून सिस्टम मजबूत होते
4 आजार दूर राहतात

साहित्य : आवळा, शेवग्याची पाने, एक ग्लास पाणी

अशी आहे कृती
प्रथम आवळ्याच्या बिया काढून घ्या आणि एका मिक्सरमध्ये आवळा, शेवग्याची पाने आणि पाणी टाकून वाटून घ्या. नंतर गाळणीने गाळून घ्या. आता ज्यूस तयार आहे. सकाळी चहा-कॉफीऐवजी हे ड्रिंक प्या आणि इम्युनिटी स्ट्राँग करा.