डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ पध्दतीनं करावं ‘गुडमार’चे सेवन, दिवसभर नियंत्रणात राहील ब्लड शुगर; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  खराब दिनचर्या, ताण-तणाव, अयोग्य आणि वेळी-अवेळी खाणे-पिणे इत्यादी कारणामुळे मधुमेह होतो. निष्काळजीपणा केल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. डायबिटीजच्या आजारात ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी गुडमारच्या पानांचे सेवन केले जाते. गुडमारला मराठीत बेडकीचा पाला सुद्धा म्हणतात, तर गुजरातीमध्ये यास मधुनाशिनी असे नाव आहे. अनेक शोधांमध्ये हा खुलासा झाला आहे की, गुडमार डायबिटीजवर रामबाण औषध आहे. याच्या सेवनाने इन्स्टंट ब्लड शुगर कमी होते. याबाबत जाणून घेवूयात –

भारताच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगढसह अनेक राज्यात ही वनस्पती आढळते. याचे नाव गुडमार म्हणजे गोडपणा संपवणारी असे आहे. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. गुडमारची पाने, खोड आणि मुळे आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध पद्धती औषधामध्ये वापरले जाते.

शोध काय सांगतो

रिसर्च गेटवर प्रसिद्ध संशोधनात गुडमारचे फायदे सविस्तर सांगण्यात आले आहेत. यामध्ये अँटी-डायबिटिक गुण आढळतात. मधुमेहासह अनेक आजारांवर हे लाभदायक आहे.

असे करा सेवन

तज्ज्ञांनुसार, रोज रिकाम्या पोटी गुडमारची पाने चावून खावी. यानंतर एक ग्लास पाणी प्या. यामुहे शुगर लेव्हल कमी होते, तसेच दिवसभर शुगर लेव्हल वाढत नाही.