Coronavirus & Diabetes : डायबिटीजच्या रूग्णांना ‘कोरोना’पासून किती आहे धोका ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – काही आजार असे असतात जे तुमच्या शरीराला अनेक बाबतीत कमजोर करतात. ज्यामुळे आरोग्य बिघडण्याचा धोका वाढतो. असाच एक आजार आहे डायबिटीज. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे होणार्‍या या आजाराची नियमित तपासणी न केल्यास, हा आजार अन्य आजारांना निमंत्रण देतो.

यासाठी असे म्हटले जाते की, डायबिटीजसोबत अनेक अन्य आजार वाढण्याचा धोका वाढतो. सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या प्रकोपातून जात आहे, अशा स्थितीत डायबिटीजच्या रूग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

कोविड-19 महामारीचा कोणत्याही निरोगी व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. तसेच हे अभ्यासात स्पष्ट झाले आहे की, ज्या लोकांना डायबिटीज, हाय ब्लडप्रेशरसारखे आजार आहेत, त्यांना कोरोनाच्या जास्त धोका श्रेणीत येतात. यातून स्पष्ट होते की, मधुमेहाने पीडित लोकांना कोरोना व्हायरसचा जास्त धोका आहे.

कोरोनो व्हायरसपासून वाचण्यासाठी स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेणे जरूरी आहे. तसेच डायबिटीजसारख्या आजाराने ग्रस्त असलेल्यांनी जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे.

तुमच्या शरीराचे आरोग्य इम्यून सिस्टमवरून समजते. जर इम्युनिटी चांगली असेल तर आरोग्यही चांगले राहील. डायबिटीज हा आजार शरीरातील ग्लुकोजचा स्तर वाढवतो, शिवाय शरीरातील इन्सुलिन बनवण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम करतो. ज्यामुळे शरीर पोषकतत्वांचा उपयोग करू शकत नाही, जे नैसर्गिक पद्धतीने अनेक इन्फेक्शनपासून आपला बचाव करते. कमजोर रोग प्रतिकारशक्तीमुळे मधुमेह पीडित लोकांना लवकर संसर्ग होतो.

कोरोना व्हायरसचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, आयसोलेशनमध्ये राहावे, आणि लोकांपासून अंतर ठेवावे. जर तुमच्या कुटुंबात डायबिटीजचा रूग्ण असेल तर त्याने गर्दीपासून दूर राहिले पाहिजे.

ज्यांना डायबिटीज आहे, त्यांनी आपल्या शरीरीत होत असलेल्या कोणत्याही बदलाकडे बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. सोबतच कोरोना व्हायरसच्या लक्षणांपासून बचाव केला पाहिजे.