Quarantine Weight Gain : महामारीदरम्यान वजन वाढलं आहे का ? नैसर्गिक पद्धतीने कमी करा चरबी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना व्हायरस महामारीचा प्रसार कमी करण्यासाठी जगभरात लॉकडाऊन लावण्यात आला होता. ज्यामुळे लोक 4-5 महिने घरातून कमीत-कमी बाहेर पडले होते. कमी झालेले वर्कआऊट आणि घरी बसल्याने वाढलेला आहार, यामुळे अनेकांचे वजन वाढले आहे. जर या काळात तुमचेही तुमचे वजन वाढले असेल तर टेन्शन घेऊ नका, कारण असे तुम्ही एकटेच नसून अनेजण आहेत. नैसर्गिक पद्धतीने वजन कसे कमी करायचे ते जाणून घेवूयात…

1 तणाव दूर ठेवा

तणावामुळे हार्मोन्समधील गडबडीमुळे चरबी वाढते. तसेच लोक जास्त खातात, आणि यामुळे वजन वाढते. यासाठी वज्रासन, कपालभाती अशी आसने करा आणि तणाव दूर ठेवा.

2 घरचे अन्न खा

बाहेरचे खाणे तुमची प्रकृती बिघडवते, आणि वजनही वाढवते. म्हणून घरी तयार केलेले अन्नच खा.

3 वर्जिन खोबरेल तेल

रोज दोन चमचे या तेलाचे सेवन करा. हे जेवणात वापरा तसेच सलाड, स्मूदी किंवा गोडपदार्थांमध्ये वापरा.

4 सफरचंदाचे व्हिनेगर

रोज एक ग्लास पाण्यासोबत 10 एमएल अ‍ॅपल व्हिनेगर घेतल्याने पोटाच्या चरबीसह वजन कमी होते.

5 दालचीनी

दालचीनी, आलं, मध आणि लिंबू टाकून ड्रिंक बनवून प्या, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

6 मीठ, साखर करा कमी

गरजेपेक्षा जास्त मीठ आणि साखर सेवन केल्याने वजन वाढते. चहा, कॉफी, ज्यूस किंवा स्मूदीमध्ये साखर जास्त वापरू नका.

7 वर्कआऊट

वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट आवश्यक आहे. झुम्बा, पोहणे, सायकलिंग किंवा अन्य प्रकारचे कार्डियो वर्कआऊट करा.

8 पूर्ण झोप

चांगल्या आरोग्यासाठी पूर्ण आणि शांत झोप आवश्यक आहे. अपुर्‍या झोपेमुळे थकवा, भूक जास्त लागते आणि मेटाबॉलिजम सुद्धा कमजोर होते. यासाठी रोज 7 ते 8 तास शांत झोप आवश्यक आहे.