‘LED लाईट्स’चे हे आहेत 10 ‘गंभीर’ परिणाम, होऊ शकतात ‘मानसिक’, ‘शारीरीक’ समस्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जास्त प्रकाश आणि कमी किंमत असणारे एलईडी लाईट्स खरेदी करण्याकडे लोकांचा कल मागील काही वर्षांपासून वाढला आहे. शिवाय, टीव्ही ट्यूब, मोबाईल स्क्रीन इत्यादीत सुद्धा एलईडी लाईट्स वापरलेली असते. परंतु, हे लाईट्स मानसिक आणि शारीरीक आरोग्यासाठी घातक असल्याचे वर्ल्ड जनरल ऑफ बायोलॉजिकल सायकाट्रीने केलेल्या संशोनात आढळून आले आहे.

रिसर्चमध्ये आढळलेले दुष्परिणाम

1  माणसाच्या संपूर्ण शारीरिक प्रक्रियेवर एलईडी लाईट्सचा परिणाम होतो.

2  पथदिवे, लाईटिंग, मोबाईलचा डिम लाईट यामुळे डोळ्यांना रंगांशी संबंधित विकार होतात.

3  काहींना रंग ओळखण्याची समस्या म्हणजेच कलर ब्लाईंडनेस येतो.

4  मोबाईलमधला डिम ब्ल्यू लाईट मेलाटोनिनचं उत्सर्जन थांबवतो. यामुळे झोपेवर गंभीर परिणाम होतात. झोपेचं चक्र बिघडतं.

5  एलईडी फ्लॅश असलेल्या उपकरणांमुळे निद्रानाशाची समस्या होऊ शकते.

6  एलईडी लाईट असणारी उपकरणे झोपण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर बंद करावी.

7  एलईडी लाईट्समुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

8  मोबाईलमधल्या ब्लू लाईटचा परिणाम डोळ्यांवर होतो. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं तयार होतात.

9  डोळ्यांचे विविध प्रकारचे विकारदेखील उद्भवू शकतात.

10  मोबाईलमधून निघणार्‍या प्रकाशाचं प्रमाण जास्त असल्यास मानसिक आरोग्यावर आणि झोपेवर खूप घातक परिणाम होतात.