बदलत्या वातावरणात ‘या’ 7 गोष्टींची काळजी घेतल्यास रहाल ‘इन्फेक्शन’ अन् ‘आजारां’पासून दूर, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वर्षभरात 6 हंगाम आहेत. प्रत्येक हंगामाची स्वतःची खास वैशिष्ट्ये असतात आणि पृथ्वीवर राहणाऱ्या जीवजंतुंपासून ते वनस्पतीपर्यंतच्या सर्व गोष्टींवर या हंगामांचा प्रभाव असतो. गरजेनुसार आपण आपल्या अन्नामध्ये आणि जीवनशैलीमध्ये काही बदल केल्यास बदलत्या हंगामासह विविध आजार आणि संक्रमणांपासून आपण बर्‍याच प्रमाणात स्वतः ला वाचवू शाकतो. आयुर्वेदात प्रत्येक ऋतू मध्ये खास आहार विहार याच्याविषयी सांगण्यात आले आहे. आयुर्वेदातील सूर्याच्या हालचालीनुसार उत्तरायण आणि दक्षिणायण अशी दोन अयान आहेत. प्रत्येक अयानमध्ये ३ ऋतू आहेत, जसे शिशिर, वसंत आणि ग्रीष्म उत्तरायण आणि वर्षा, शरद आणि हेमंत हे तीन ऋतू दक्षिणायन मध्ये येतात. वसंत ऋतु सध्या चालू आहे ज्याबद्दल आपन बोलू.

वसंत ऋतू मार्च महिन्यात होळीच्या पहिल्या दिवशी सुरू होतो आणि मे महिन्यात वसंत पंचमीच्या 40 दिवसानंतर संपतो. वसंत ऋतुत झाडांना नवीन पालवी फुटते भरपूर फुलं येतात. त्यामुळे झाडं उठून दिसतात. म्हणूनच वसंत ऋतूला ऋतूंचा राजा देखील म्हंटले जाते. आयुर्वेदानुसार, या वेळी सूर्याच्या प्रखर किरणांमुळे शरीरात जमा होणारा कफ दोष दिसून येतो, ज्यामुळे भूक न लागणे, सर्दी,खोकला,पाचक शक्ती कमी होणे , ऍलर्जी इत्यादी अनेक आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत खालील गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये नक्कीच सामील करा.

1. वसंत ऋतू मध्ये सर्वात सहज पचल्या जाणाऱ्या द्रव्यांचा वापर केला पाहिजे. बार्ली, गहू, तांदूळ इत्यादींनी बनलेले पदार्थ खा, डाळीत मटार-मूग डाळ, भाज्यांमध्ये कारले, वांगे, मुळा, इ. खा.

2. स्वयंपाकात तीळ किंवा मोहरीचे तेल वापरा. आले, धणे, कांदा, लसूण, तुळस, लिंबू , जिरे इत्यादी पदार्थांचा विशेषतः वापर करावा.

3. कफ कमी करण्यासाठी मध वापरा.

4. उशीरा पचन होतील अश्या पदार्थांचे सेवन कमी करा. थंड, चिकट, तळलेले,चटपटीत आंबट-गोड पदार्थ, दही इत्यादीचे सेवन कमी करा.

5. अंघोळ करताना कोमट पाण्याचा वापर करा.

6. नियमित व्यायाम करा आणि चंदन पावडर चा वापर करा.

7. वसंत ऋतूत दिवसा झोप घेणे टाळाच