Heart Attack Symptoms : ‘या’ 10 लक्षणांच्या मदतीने ओळखा हार्ट अटॅकचा धोका !

पोलिसनामा ऑनलाइन – बहुतांश वेळा लोक हृदय विकारांच्या सुरूवातीच्या संकेतांकडे दुर्लक्ष करतात. या दुर्लक्ष करण्यामुळे पुढे होणारा परिणाम अतिशय जीवघेणा ठरू शकतो. संशोधकांनी सांगितलेल्या महितीनुसार हृदयाच्या आजाराने होणार्‍या मृत्यूंमध्ये प्रत्येक सहा प्रकरणात एका व्यक्तीचा मृत्यू हा सुरूवातीच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करण्याच्या चूकीमुळे होतो, असे म्हटले आहे. हे ब्रिटनमध्ये केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. हार्ट अटॅकची कोणती लक्षणे आहेत ते जाणून घेवूयात…

हार्ट अटॅकची लक्षणे

1. छातीत वेदना होतात. हृदयावर दाब.

2. छातीपासून हातापर्यंत वेदना होणे ही वेदना शक्यतो डाव्या हाताला होते. परंतु कधीकधी दोन्ही हातांना असे होऊ शकते. ही वेदना तोंड, मान, पाठ आणि पोटाकडे जाते.

4. मन अशांत किंवा चक्कर येणे.

5. मोठ्याप्रमाणात घाम येणे.

6. श्वास घेण्यास त्रास होणे.

7. मळमळ, उलटीसारखे वाटणे.

8. अस्वस्थ वाटणे.

9. खोकल्याची उबळ, जोरजोरात श्वास घेणे.

10. हार्ट अटॅकमध्ये छातीत जोरात वेदना होते, पण काही लोकांमध्ये हलकी वेदना होऊ शकते. काही बाबतीत छातीत वेदना होत नाहीत. विशेषता काही महिला, वृद्ध आणि डायबिटीज रूग्णांना वेदना होत नाहीत.