Heart Attack Risk At Women : महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात हृदयविकाराचा धोका, जाणून घ्या लक्षणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   स्त्रियांमध्ये हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी आहे असा समज लोकांमध्ये आहे. परंतु तुम्ही जर असे मानत असाल तर तुमचा कुठेतरी गैरसमज होत आहे. वास्तविक महिलांमध्ये हृदयरोगाचा धोका पुरुषांपेक्षा कमी नसतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या सर्वेक्षणानुसार गेल्या 10 वर्षात अमेरिकेतील दर पाच मृत्यूंपैकी एक मृत्यू हृदया-संबंधित आजारामुळे झाला आहे. ही माहिती सर्क्युलेशन ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशन या जर्नलमध्ये मिळाली आहे. विशेष म्हणजे महिलांना याची माहिती नव्हती. हृदयरोगाचा धोका एवढ्या मोठ्या प्रमाणात असू शकतो या गोष्टीकडे महिला नेहमीच दुर्लक्ष करतात. सर्वेक्षणानुसार महिलांमध्ये हृदयरोगांबद्दल जागरूकता नसल्यामुळे त्या हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडतात, ज्यामुळे त्यांचे मृत्यू देखील होतात. म्हणून या बद्दल महिलांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.

महिलांविषयक आवश्यक माहिती :

जेव्हा एखाद्या महिलेस हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा त्यात आढळणारी लक्षणे पुरुषांपेक्षा भिन्न असतात. जरी पुरुष आणि स्त्रियांमध्ये छातीत दुखणे यात साम्य आहे परंतु या व्यतिरिक्त स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची अनेक लक्षणे आहेत. जी पुरुषांच्या लक्षणांशी वेगळी आहेत.
न्यूयॉर्कमधील लेनोक्स हिल या हॉस्पिटलमधील डॉक्टर युजेनिया जिओनोस म्हणतात की या अभ्यासानुसार धक्कादायक बाब म्हणजे सन 2009 च्या तुलनेत 2919 मध्ये स्त्रियांच्या हृदयासंबंधित रोगाची टक्केवारी अत्यंत चिंताजनक आहे. उच्च रक्तदाब असणाऱ्या महिलांना हृदयरोगांबद्दल जास्त काही माहिती नसल्याचे देखील समोर आले. हृदयरोगासंबंधी माहितीचा अभाव हे त्याचे कारण होते. अशा परिस्थितीत महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची इतर लक्षणे कोणती आहेत हे जाणून घेणे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ही भिन्न लक्षणे आहेत :

पाठदुखी, पोट दुखणे, दोन्ही हात दुखणे, शरीरातून थंड घाम येणे, छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे,उलट्या होणे,छाती दुखणे .ई

हृदयविकाराची कारणे :

उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रोल वाढणे, मधुमेह,धूम्रपान करणे,लठ्ठपणा किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी.

आपण या आजारापासून सुरक्षित कसे राहू? खालील नियमांचे पालन करा. नियमित सकस आहार घ्या, सोबत फळे व भाज्या नियमित खा. कडधान्याचे सेवन करा. कोलेस्टेरॉल नेहमी कमी करा. खाण्यात मीठ आणि साखर कमी करा. अल्कोहोलचे सेवन करू नये. ताण घेऊ नका. तसेच नियमित व्यायाम करत रहा..