दारूच्या अति सेवनाने वाढतो ‘स्ट्रोक’ आणि ‘पीएडी’चा धोका ! ‘स्टडी’तील ‘हे’ 8 निष्कर्ष जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   दारू पिणे आरोग्यासाठी चांगले नाही, शिवाय एका नव्या अभ्यासात असा खुलासा झाला आहे की, जास्त दारू प्यायल्यने स्ट्रोकचा धोका वाढतो. एवढेच नव्हे, तर अति दारूच्या सेवनाने पेरिफेरल आर्टरी डिसीज (पीएडी) रोग सुद्धा होऊ शकतो. शिवाय अन्य संशोधनात हेदेखील आढळले आहे की, यामुळे हृदयरोग सुद्धा वाढतात. जीनोमिक अँड प्रिसिजन मेडिसीन जर्नल रिपोर्टमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार संशोधकांनी मेंडेलियन रँडमायजेशन नावाच्या वेगळ्या पद्धतीचा वापर केला. ही पद्धत रोगाच्या धोक्याची संभाव्य डिग्री निर्धारित करण्यासाठी जेनेटिक व्हेरियंट ओळखते. स्वीडनमध्ये करोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये हे संशोधन करण्यात आले.

काय सांगतात संशोधक

1 दारूची सर्वाधिक विक्री मृत्यू आणि अपंगत्वाचे कारण सुद्धा आहे.

2 संशोधनात युकेच्या 5 लाख रहिवाशांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला.

3 संशोधनाचे निर्ष्कर्ष सांगतात की, अति दारूच्या सेवनाने पेरिफेरल आर्टरी डिसीजची वाढ तिप्पट होते.

4 पेरिफेरल आर्टरी डिसीज म्हणजे रक्तवाहिन्यांचा रोग, हा ब्लड सर्क्युलेशनसंबंधी एक आजार आहे, यामध्ये हृदय आणि मस्तिष्काशिवाय शरीरातील अन्य भागातील नसा संकुचित होऊ लागतात.

5 या आजारात नसा पूर्णपणे ब्लॉक म्हणजे बंद सुद्धा होऊ शकतात. त्यांच्यामध्ये गाठी बनू शकतात. जास्तकरून हे पायांमध्ये होते.

6 स्ट्रोक अपंगत्व आणि मृत्यूचे प्रमुख कारण आहे. संशोधनानुसार स्ट्रोरचे प्रमाण वाढते. स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा मेंदूतील रक्त पुरवठा ब्लॉक होतो. किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटते. यामुळे मेंदूच्या ऊतींमध्ये ऑक्सीजन आणि पोषकतत्वांची कमतरता होते आणि काही मिनिटात मस्तिष्काच्या पेशी मरू लागतात.

7 स्ट्रोकमुळे मस्तिष्काचे नुकसान, दीर्घकालिन अपंगत्व, तसेच मृत्यू देखील होऊ शकतो.

8 स्ट्रोक आणि पेरिफेरल आर्टरी डिसीजशिवाय अन्य हृदयरोगसुद्धा होतात, यावर संशोधनाची आवश्यकता आहे.