Headaches Home Remedies : डोकेदुखीपासून हवीय सुटका, तर औषध नाही करा ‘हे’ 9 उपाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   दगदगीच्या या जीवनात डोकेदुखी एक सामान्य समस्या आहे. तणाव, वर्क लोड आणि वाढत्या समस्या, डोकेदुखीचे सर्वात मोठे कारण आहे. अनेकदा डोकेदुखी इतकी वाढते की, आपल्याला नाईलाजाने सतत औषधं खावी लागतात. मात्र, यामुळे शरीराचे नुकसान सुद्धा होऊ शकते. तुम्हालाही तणावात डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल तर, औषधांचे सेवन बंद करा. आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, जे डोकेदुखीपासून आराम देण्यात मदत करतील.

हे आहेत उपाय

1 सतत डोकेदुखी होत असेल तर, गरम पाण्यात जायफळ पावडर मिसळून प्या.

2 लवंग तेलात खोबरेल तेल मिसळा आणि ते कपाळावर लावा.

3 जर मायग्रेनची समस्या असेल तर गाजर ज्यूस पिण्याची सवय करून घ्या. विनाऔषध दिलासा मिळेल.

4 दोन मोठे चमचे आल्याचा रस, दोन चमचे लिंबू रस मिसळून हे मिश्रण दिवसातून दोन वेळा वापरा.

5 तुळशीची पाने चंदन पावडरमध्ये वाटून कपाळावर लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.

6 लसूणचा रस प्यायल्यास डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो.

7 जास्त डोकेदुखी असेल तर चार-पाच लवंग तव्यावर गरम करून एखाद्या कपड्यात बांधून थोड्या-थोड्या वेळान वास घेत राहा.

8 खोबरेल तेलाने मसाज करू शकता.

9 अनेकदा डोकेदुखी घट्ट वेण्या, टोपी किंवा पगडी बांधल्याने सुद्धा होते. असे असेल तर ते लूझ करा.

You might also like