Headaches Home Remedies : डोकेदुखीचा त्रास असेल तर जाणून घ्यात्यावरील परिणामकारक उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्याच्या धकाधकीच्या जीवनात डोकेदुखीचा त्रास असणं हे सामान्य झालं आहे. ताण, कामाचा व्याप, वाढत्या अडचणी ही डोकेदुखीची मोठी कारणं आहेत. अनेकवेळा डोकं इतकं जास्त दुखतं की नाईलाजास्तव आपल्याला मेडिसिन घ्यावं लागतं. डोकेदुखीवर नेहमी मेडिसिन घेणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जर तुम्ही सुद्धा डोकेदुखीने ग्रस्त असाल तर डोकेदुखीवरील मेडिसिन घेणं बंद करा. कारण आम्ही तुम्हाला डोकेदुखीवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची डोकेदुखी थांबण्यास मदत होईल.

डोकेदुखीवरील काही घरगुती फायदेशीर उपाय

– जर तुमचं सारखं डोकं दुखत असेल तर गरम पाण्यात जायफळची पावडर टाकून पिल्याने आराम मिळेल.

– लवंगाचं तेल खोबरेल तेलात मिसळून ते कपाळावर लावा, डोकेदुखी कमी होईल.

– जर तुम्हाला माइग्रेनचा त्रास असेल तर गाजराचा ज्यूस पिल्याने माइग्रेनमुळे होणारी डोकेदुखी थांबेल.

– आल्याचा रस डोक्यातील रक्तवाहिन्यांवरील सूज कमी करण्यास उपयुक्त आहे. दोन चमचे आल्याचा रस आणि दोन चमचे लिंबाचा रस मिसळून दिवसातून दोन वेळा कपाळावर लावा, डोकेदुखी कमी होईल.

– तुळशीची पानं चंदनाच्या पावडरमध्ये मिसळून माथ्यावर लावा डोकेदुखी कमी होईल.

– लसूनाचा रस पिल्याने डोकेदुखी थांबते.

– चार पाच लवंगा तव्यावर गरम करून त्या एका कापडात बांधून त्याचा वास घ्या, डोकेदुखी थांबेल.

– खोबरेल तेलाने डोक्याची मालिश करा.

– डोक्याला पगडी, टोपी किंवा गच्च वेणी घालू नका, त्यामुळं डोकं दुखत असेल तर ते सैल करा.