अ‍ॅसिडिटी आणि गॅसने असाल त्रस्त, तर करा ‘हे’ 6 घरगुती उपाय, मिळेल आराम

सध्याच्या धावपळीच्या जीवनात सुद्धा सर्वांकडे वेळेची कमतरता आहे. यामुळे अनेक लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे आजारी पडण्याचे प्रामण वाढते. अनियमित आहार याचे मुख्य कारण आहे. पौष्टिक खाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा अ‍ॅसिडिटीसारखी समस्या होते. जर कुणाला अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर समजून जा की तुमची पचनशक्ती व्यवस्थित काम करत नाही.

ही आहेत लक्षणे

1 भूक न लागणे, पोट भरल्यासारखे वाटणे.
2 उलटी, कफ होणे.
3 डोकेदुखी आणि श्वासात दुर्गंधी.
4 मळमळ, आंबट ढेकर, जळजळ.

करा हे घरगुती उपाय

1 बडीसोफ
बडीसोफ पचनतंत्र ठिक करते. अर्धा ग्लास थंड दुध आणि अर्धा ग्लास पाण्यात एक चमचा वाटलेली बडीसोफ आणि एक चिमुट इलायची पावडर, एक चमचा पीठी साखर टाकून प्या.

2 आले
जेवण झाल्यानंतर रोज आले आणि लिंबूचा एक चमचा रस प्यायल्याने गॅसची समस्या ठिक होते.

3 जीरे
दही किंवा ताकात जिरे पावडर टाकून प्यायल्याने सुद्धा गॅसची समस्या दूर होते.

4 पपई
पपई खाल्ल्याने पोटाचे विकार दूर होतात. अ‍ॅसिडिटीसुद्धा दूर होते.

5 आवळा
रोज 4-5 आवळ्यांचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या ठिक होतात.

6 सलाड
काकडी, टोमॅटो, कांदा, मुळा इत्यादीचे सलाड रोज खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळातो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like