Covid-19 & Kidney Disease : कोविड-19 संसर्गाला गंभीर बनवतो किडनीचा आजार !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गायसिंगर इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्डच्या एका विश्लेषणात ही गोष्ट समोर आली आहे की, किडनीचा जुना आजार कोविड रुग्णाचे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे सर्वांत मोठे करण आहे.

गायसिंगरच्या रिसर्च टीमने सुमारे 13 हजार अशा लोकांच्या हेल्थ कार्डचा अभ्यास केला, ज्यांनी कोविड-19 ची टेस्ट केली होती. या ग्रुपमधून 1,604 कोविड पॉझिटिव्ह आढळले होते आणि यापैकी 354 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले होते.

टीमने कोविड-19 च्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्ण आणि विशिष्ट निदान स्थिती जसे की किडनी, हृदय, श्वसन आणि चयापचयाच्या स्थितीमधील संबंध समजून घेण्यासाठी विश्लेषण केले होते. एकूण, क्रोनिक किडनी रोगाने पीडित लोकांची हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची जोखीम सर्वांत जास्त होती आणि ज्या रुग्णांना किडनीचा आजार नाही, त्यांच्या तुलनेत रीनल रोगाच्या अंतिम टप्प्याच्या कोविड-19 रुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची शक्यता 11 पट जास्त होती.

गायसिंगर नेफ्रोलॉजिस्ट डॉ. एलेक्स चँग यांनी सांगितले की, अगोदर झालेल्या संशोधनात काही आरोग्य स्थितींचा शोध घेतला होता, जो कोविड रुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या संबंधित आहे, यामध्ये हार्ट फेलियर, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि क्रोनिक किडनी रोगांचा समावेश आहे.

चँग यांनी हेसुद्धा म्हटले की, हे निष्कर्ष मूत्रपिंडाचा आजार आणि अन्य उच्च जोखमीच्या स्थितीच्या रुग्णांमध्ये कोविड संबंधित आजाराला रोखण्याच्या आवश्यकतेला दर्शवतात.

अजूनपर्यंत हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही की, कशाप्रकारे अंतर्गत चिकित्सा स्थिती कोविड-19 शी संबंधित गुंतागुंतीला वाढवते. मात्र, अभ्यासातून हे समजले आहे की, कोविड-19 संसर्गाची खूपच प्रखर प्रतिक्रियेमुळे होणारा शारीरिक तणाव जुन्या रोगांनी अगोदर कमजोर अवयवांना अस्थिर करू शकतो किंवा अवयवांना व्हायरसमुळे झालेली दुखापत एखाद दुसर्‍या झटक्याच्या रूपात काम करते.

You might also like