महत्वाचे : दुधातील भेसळ ‘अशी’ ओळखा

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – सध्या दुधाला जास्त भाव मिळावा, ते जास्त दिवस टिकून राहावं म्हणून दुधात भेसळ केली जाते. आणि भेसळ केलेलं हे दूध शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. भेसळीचे दूध पिल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. दूध हे शरीराला चांगले असते. आणि आजारपणात तर डॉक्टर हमखास दूध पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आपल्याला दूध आवडत नसेल तरी आपण ते पितो. एव्हाना आपल्याला ते प्यावं लागत. पण तुम्ही जे दूध पिता त्या दुधात भेसळ आहे कि नाही. हे तुम्हाला दुधाच्या वासाने आणि चवीने कळते. दुधातील भेसळ ओळखण्याच्या या काही टिप्स.

१) १० मिलीलीटर दुधात तेवढच पाणी मिसळा. पाणी मिसळल्यानंतर त्यात जर फेस तयार झाला तर तुमच्या दुधात डिटर्जंट पावडरची भेसळ आहे असे समजा.

२) १० मिलिलीटर दुधात पोटॅशीयम कार्बोनेटचे ५-६ थेंब टाका. दुधाचा रंग जर पिवळा पडला तर समजा त्यात युरियाची भेसळ आहे.

३) ५ मिलिलिटर दुधात आयोडीनचे २-३ थेंब टाका नंतर दुधाचा रंग जर फिक्कट निळा झाला तर समजा दुधात स्टार्चची भेसळ आहे.

४) तुम्ही दुधात जर दोन बोट बुडवली. आणि ती एकमेकांवर चोळली तर साबणासारखा स्पर्श जाणवतो. आणि ते दूध जे उकळले तर त्याचा रंग पिवळा होतो. असं झाल्यास तुम्ही जे दूध आणलंय ते कृत्रिम दूध आहे असं समजा.

दुधाला चांगला भाव मिळावा. म्हणून दूध विक्रेते दुधात अशा प्रकारची भेसळ मिसळतात. आणि त्यामुळे आपले आरोग्य खूप धोक्यात येते. त्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग करून आपल्या दुधात भेसळ आहे का हे तपासून पहा आणि मगच त्या दुधाचा वापर करा.