Disinfect Home : कोरोना व्हायरस इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी ‘या’ पध्दतीनं करा घर डिसइन्फेक्ट; जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लॉकडाऊनला शस्त्राप्रमाणे वापरले जात आहे. तर लॉकडाऊन असल्याने लोकांना बहुतांश वेळ घरातच रहावे लागत आहे. घराच्या बाहेर आपण मास्क, सॅनिटायझर अशी सर्व काळजी घेतो, परंतु घरात आपण पूर्णपणे सुरक्षित असतो का? कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी घरात पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. घर कोविड मुक्त करण्यासाठी स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे.

सतत स्पर्श होणार्‍या वस्तू स्वच्छ करा :
कोरोना व्हायरस हवेत तीन तासापर्यंत राहू शकतो, 24 तासापर्यंत कार्डबोर्ड, तीन दिवसापर्यंत प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टील सारख्या पृष्ठभागावर जिवंत राहू शकतो. यासाठी कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्लास्टिक, कार्डबोर्ड अणि स्टीलसारख्या वस्तूंची स्वच्छता केली पाहिजे.

वीजेची बटने आणि दरवाजे
कोरोनापासून घर सुरक्षित ठेवण्यासाठी घरातील विजेची बटने, दरवाजे, खिडक्यांना किटाणुनाशक लावा आणि स्प्रेचा वापर करून स्वच्छ करा. इसोप्रोपाईल अल्कोहल आणि हायड्रोजन पेरॉक्साईड सारख्या प्रॉडक्ट्सने घर सॅनिटाइज करू शकता. बाजारात विविध प्रकारचे सुवासिक किटाणुनाशक मिळतात ज्यांचा वापर करू शकता.

वारंवार वापरल्या जाणार्‍या वस्तू
पाण्याच्या बाटल्या, चप्पल, कपाट, पाण्याचे नळ, स्वयंपाक घर आणि बाथरूम सुद्धा कीटाणुनाशकाचा वापर करून स्वच्छ करा.

अशा वस्तू ज्यांचा जास्त वापर होतो
गॅस स्टोव्ह, डायनिंग टेबल, टेबलटॉप, सोफा, चेयर्स, टॉयलेट, डस्टबीन, रेफ्रिजरेटर, डिशवॉशर, ओव्हन, मायक्रोवेव्ह हँडल, रिमोट कंट्रोल, गेम कंट्रोलर, सेल फोन, टॅबलेट, मोबाइल डिव्हाइस, कम्प्यूटर टेबल, कम्प्युटर कीबोर्ड, माऊस आणि जिन्याचे रेलिंग ज्याचा सर्वजण वापर करतात, अशा वस्तू स्वच्छ होणे खुप आवश्यक आहे.