Dry Cough Home Remedies: बदलत्या हंगामात ‘कोरडा खोकला’ असेल, तर त्यावर करा ‘हे’ घरगुती उपचार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   थंड हवामानात होणारा कोरडा खोकला आपला दिवस आणि रात्रीचा आराम हिसकावून घेतो. एकदा खोकला सुरू झाला की तो तासनतास त्रास देत राहतो. खोकला इतका जास्त असतो की, यामुळे घसा खवखवतो आणि वेदनादेखील होतात. या हंगामात कोरडा खोकला व्हायरल इन्फेक्शन, सर्दी किंवा फ्लू, वाढते प्रदूषण आणि धूळ व माती अशा विविध कारणांमुळे अधिक प्रमाणात होतो. कधी कधी कोरडा खोकला अ‍ॅलर्जीमुळेदेखील होतो.

हवामान वेगाने बदलत आहे आणि आपल्या थंड पदार्थ खाण्यापिण्याच्या सवयी अजूनही उन्हाळ्याच्या हंगामाप्रमाणेच राहिल्या आहेत. कोल्ड ड्रिंक आणि कोल्ड वॉटर अजूनही आपल्या सवयीमध्ये टिकून आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. कोरड्या खोकल्यामुळे जर आपणासदेखील त्रास होत असेल तर याचा उपचार औषधांनी नव्हे तर स्वयंपाकघरातील काही वस्तूंनी करा.

कोरडा खोकला म्हणजे काय?

कोरड्या खोकल्याच्या दरम्यान घशातून कफ येत नाही, परंतु खोकला जोरदारपणे लागतो. यामुळे घसा कोरडा होतो आणि घशात जळजळ आणि अस्वस्थता जाणवते. कोरड्या खोकल्यामुळे रात्री अधिक त्रास होतो. श्वसननलिका आणि घशातील सुजेमुळे झोपेच्या वेळी रात्री श्वास घेण्यास अडचण येते. घशात कोरडेपणा अधिक होतो, ज्यामुळे वारंवार खोकला येतो.

खोकला दूर करण्यासाठीचे उपाय :

हळद आणि आल्याच्या दुधाचे सेवन करावे

एक ग्लास दूध गरम करून त्यात आले बारीक करून टाकावे. दूध गोड करण्यासाठी त्यात साखर वापरू नका तर गुळाचा वापर करा. गूळ विरघळल्यावर त्यात थोडी हळद घाला. आता दूध गाळून हलके गरम असताना त्यास प्यावे. या दुधाचे सेवन केल्याने खोकल्यापासून आराम मिळेल.

मध आणि मुलेठीच्या वापरामुळे मिळेल आराम

कोरड्या खोकल्यामध्ये मध हे खूप उपयुक्त आहे. छोटा अर्धा चमचा मुलेठीचे चूर्ण दोन चमचा मधात मिसळावे. ही पेस्ट हळूहळू चाटून खावी, तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळेल.

तुळशीच्या पानांचे सेवन करावे

तुळशीची पाने पाण्यात उकळवून त्याचा काढा बनवून प्यावा, असे केल्याने खोकल्यापासून आराम मिळेल. आपण तुळशीच्या पानांचा रस आणि आल्याचा रस एकत्रित करून तो मधाबरोबरदेखील खाऊ शकता, खोकल्यापासून त्वरित आराम मिळेल.

मिठाच्या पाण्याने खोकला दूर करा

एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी गुळण्या करा. जर आपण दिवसातून दोनदा गुळण्या केल्या तर कोरड्या खोकल्यापासून आराम मिळेल.

गिलॉयचा वापर करून जुन्या तीव्र खोकल्यावर करा उपचार

गिलॉयमध्ये असे औषधी गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि बर्‍याच रोगांवर उपचारदेखील करतात. जर आपल्याला खोकल्यामुळे त्रास होत असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्यापोटी गिलॉयचा रस पिल्याने जुना खोकलादेखील बरा होऊ शकतो.