Mucormycosis : ब्लॅक फंगसचा सर्वाधिक धोका कोणाला? कसा करावा बचाव, जाणून घ्या आरोग्यमंत्री काय म्हणतात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोनाचे थैमान जगभरात सुरु आहे. असे असताना आता कोरोनाबाधितांना ब्लॅक फंगस या नव्या आजाराचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. याला म्युकोरमायकोसिसही म्हटले जाते. यावर वेळीच उपचार झाले नाहीतर रुग्णाला दृष्टीही गमावू लागू शकते. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या आजाराची बाधा झाल्यानंतर रुग्णांच्या दृष्टीवर याचा परिणाम दिसतो. सध्या अनेक रुग्णालयांमध्ये या आजारावर उपचार करण्यासाठी स्पेशल वॉर्ड बनवण्यात आला आहे.

काय आहे ब्लॅक फंगस?

ब्लॅक फंगस हा दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यांना याचा धोका जास्त असतो. हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते. ब्लॅक फंगस चेहरा, फुफ्फुस आणि मेंदूवर याचा परिणाम करतो.

कोरोनाबाधितांचा जास्त धोका

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये म्युकोरमायकोसिसचे नवी प्रकरणे जास्त प्रमाणात आढळत आहे. तसेच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशांनाही याची बाधा होत असते.

काय आहेत याची लक्षणे?

डोळे-नाकात दुखणे किंवा लाल होणे, ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण, रक्ताची उलटी होणे हे प्रमुख लक्षणे आहेत. ब्लॅक फंगस इन्फेक्शन हा आजार झाल्यानंतर चेहऱ्यावर सुन्नपणा येतो. त्यामुळे रुग्णांचे नाक बंद होते. तसेच पीडित रुग्णाच्या डोळ्यात वेदना आणि सूज येते.

यावर उपाय काय?

ब्लॅक फंगस इन्फेक्शन हा आजार झालेल्या निम्म्या लोकांचा यामध्ये मृत्यू होतो. जर सुरुवातीलाच तुम्हाला या आजाराची माहिती मिळाली तर वेळेत उपचार घेतल्याने त्याचा फायदा होतो. जर तुमचे डोळे, गालावर सूज अशाप्रकारचे लक्षणे दिसली तर बायोप्सीपासून इन्फेक्शनबाबत माहिती घेता येऊ शकते. तसेच यासाठी शस्त्रक्रियाही करावी लागते.

ब्लॅक फंगसचा संसर्ग होतो कसा?

ज्या लोकांचे मुधमेह नियंत्रणात नाही. स्टेरॉईड दिल्यामुळे इम्युनिटीवर प्रभाव टाकतो. तसेच जी व्यक्ती बऱ्याच कालावधीपासून आयसीयूमध्ये उपचार घेत असेल तर त्यांना फंगल इन्फेक्शन लवकर होऊ शकते.

काय करावे…

–  जर तुम्हाला या आजारापासून वाचायचे असेल तर तुम्ही रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करावे.

–  कोरोनातून बरे झाल्यानंतर मधुमेहात ब्लड ग्लुकोज लेव्हलला मॉनिटर करते.

–  स्टेरॉईडचा वापर काळजीपूर्वक करावा

–  ऑक्सिजन थेरपीच्या दरम्यान ह्युमिडीफायर्समध्ये साफ, स्टराईल पाण्याचा वापर करावा.

–  अँटिबायोटिक्स किंवा अँटी फंगल औषधांचा वापर विचारपूर्वक करावा.

ही खबरदारी घ्या…

–  संक्रमणावर लक्षणांवर लक्ष देणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष करू नये

–  फंगल इन्फेक्शन झाल्याचे समजल्यानंतर मोठी पावले उचलण्यासाठी घाबरून जाऊ नये

–  म्युकरमायकोसिस असेल तर त्याचा उपचार सुरु करण्यात उशीर करू नये.