Dengue Prevention : डेंग्यूच्या आजारापासून बचाव केला जावू शकतो ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्या जगभरात कोरोनामुळे इतर कोणत्याच रोगाला जास्त महत्व दिलं जात नाहीये. कोरोना महामारी संसर्गजन्य असल्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. कोरोना सोडून सध्या अजून कशाचा आपल्याला आहे आणि त्यावर उपाय म्हणून काय केलं पाहिजे याची आपण माहिती घेणार आहोत. याकाळात जर तुम्हाला डेंग्यूही होऊ शकतो, कारण सध्या पावसाळा असल्याने डासांचं प्रमाण वाढलं आहे. हा रोग डासांच्या चावल्याने पसरतो. म्हणूनच याला विषाणूजन्य संसर्ग असे म्हटले गेले आहे.

डेंग्यू एडीस नावाच्या मादी डासांमुळे होतो. डेंग्यूचा परिणाम सर्व वयोगटातील लोकांना होतो. तीव्र डोकेदुखी, ताप आणि शरीराचा त्रास, स्नायूवरील ताण, सूज, वेदना यासारखी लक्षणे डेंग्यूमध्ये दिसतात. ताप, पुरळ आणि डोकेदुखीची उपस्थिती ही डेंग्यूचे वैशिष्ट्य असून याला डेंग्यू ट्राईड असंही म्हटलं जातं.
एसएमएस मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. यूएस अग्रवाल यांनी स्पष्ट केलं की, डेंग्यूचा संसर्ग रोखण्यासाठी बरेच संशोधन झालं आहे, आणि काही उपचारपद्धतीही शोधल्या गेल्या आहेत. डेंग्यू पूर्णपणे बरा करू शकेल अशी कोणतीही लस अद्यापपर्यंत बनविण्यात आलेली नाही. परंतु प्रतिबंध व उपचारांमुळे त्याच्यावर आपल्याला यशस्वी मात करता येईल.

भारत सरकारने डेंग्यू होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी याबद्दलच्या काही सूचना-

1. दिवसा डास चावण्यापासून रोखणारी उत्पादने वापरा.

2. रात्री डासांच्या मच्छरदाणी घेऊन झोपा.

3. बाहेर जाताना पूर्ण हातमोजे वापरा आणि लांब पँट इत्यादी वापरा घाला. विशेषत: जेव्हा आपण डेंग्यू बाधित भागाला भेट देता तेव्हा तिथं आपल्याला डास चावू नयेत याची काळजी घ्या.

4. डासांचे प्रजनन कमी करण्यासाठी पाण्याची टाकी नेहमी झाकून ठेवा.

5. घराच्या आसपास कोठेही पाणी जमा होऊ देऊ नका कारण पाण्यात डासांचा प्रजनन दर वाढतो.
तसेच आपण डेंग्यू होऊ नये यासाठी ‘एस्पिरिन’ औषध कमी घेतलं पाहिजे कारण यामुळे रक्तस्त्राव वाढू शकतो. चांगले पॅरासिटामोल औषधे घेतल्यास आराम मिळतो. द्रव आणि द्रवपदार्थांचे पुरेसे सेवन आणि पुरेसा विश्रांती देखील यास लढायला मदत करू शकते.