Air Pollution Infections : ‘या’ 10 पद्धतीनं आपले डोळे, फुफ्फुस, हृदय आणि त्वचेला वाचवा प्रदुषणापासून !

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीसाठी लावण्यात आलेला लॉकडाऊन हटवल्यानंतर दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा प्रदुषण भयंकर स्तरावर वाढले आहे. पिक जाळणे, वाहनांचा धूर, कारखान्यांमूधन निघणारे प्रदूषण आणि दिवाळीचे फटाके दिल्लीच्या वातावरणाला धोकायदायक बनवतात. अशाप्रकारच्या प्रदूषणामुळे गंभीर आजार होऊ शकतात. मानवी आरोग्यावर प्रदुषणाचा गंभीर परिणाम होतो. छोट्या किंवा कमी प्रदुषकांच्या संपर्कात आल्यानेही श्वास किंवा हृदयाच्या आजाराची समस्या वाढू शकते.

यासाठी डोळे, फुफ्फुस, हृदय, त्वचेसह संपूर्ण आरोग्याचे रक्षण करण्यासाठी काही सूचना :

1. अस्थमा सारखा आजार असल्यास नेहमी इन्हेलर सोबत ठेवा आणि त्याचा वापर करा.

2. असा फेस मास्क वापरा जो हवेतील सूक्ष्म कणांपासून वाचवेल, जे फुफ्फुसोच नुकसान करू शकतात.

3. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी नेहमी सनग्लासेस किंवा मोठ्या फ्रेमचा चष्मा वापरा

4. डोळ्यांच्या जवळपासच्या त्वचेवर हाय-क्वालिटीच्या मेकअपचा वापर करा. सर्वात चांगले म्हणजे मेकअपच लावू नका. मेकअपमुळे डोळ्यांमध्ये धोकादायक बॅक्टेरिया जाण्याचा धोका वाढतो.

5. थोड्या-थोड्या वेळानंतर पापण्या उघड-झाप करा, कारण यामुळे डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून वाचू शकता. लॅपटॉप किंवा मोाबईल वापरताना सुद्धा असे करा.

6. घरी डोळ्यावर थंड कुलिंग पॅक लावा. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.

7. ज्या रस्त्यांवर प्रदूषणाचा स्तर कमी असेल त्याचा वापर करा.

8. शक्य असल्यास लॅपटॉप आणि मोबाइलचा वापर कमी करा.

9. डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांसाठी आय-ड्रॉप घ्या.

10. जास्त प्रदुषण असल्यास बाहेर धावणे किंवा इतर एक्सरसाइज करू नका. मात्र घरात किंवा जिममध्ये वर्कआउट करू शकता.