Treating COVID-19 at Home : घरात ‘कोरोना’च्या रूग्णाची देखभाल करत असाल तर ‘या’ पध्दतीनं घ्या स्वत:ची काळजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेत लाखो लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत. या व्हायरसने पीडितांची संख्या इतकी वाढली आहे की, हॉस्पिटल फुल झाले आहेत, ऑक्सीजन, औषधे, बेडची मोठी टंचाई जाणवत आहे. हा भार कमी करण्यासाठी कमी लक्षणे असलेल्या रूग्णांना घरात आयसोलेशनमध्ये राहून आजारावर उपचार करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु घरातील रूग्णाची देखभाल करण्याची जबाबदारी कुटुंबातील दुसर्‍या सदस्यांवर येते. अशावेळी कुटुंबातील निरोगी लोकांसह स्वत:ला वाचवणे आवश्यक ठरते. यासाठी देखभाल करणार्‍यांनी कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेवूयात…

अशी घ्या काळजी
* पॉझिटिव्ह रूग्णापासून 6 फुटाचे अंतर ठेवा. जागा कमी असेल तर मास्क वापरा. मास्कला हात लावू नका. मास्क डस्टबिनमध्ये टाका. मास्क बदलत रहा.
* एकच बाथरूम असेल तर सर्वांनी अगोदर वापरावे नंतर रूग्णाला वापरण्यास द्यावे. नंतर ते सॅनिटाइज करा.
* रूग्ण ज्या वस्तूंना स्पर्श करतो त्या सर्व वस्तू नियमित डिसइन्फेक्ट करा. रूग्ण्याचे टीशू पेपर आणि हँडग्लव्हज वेगळ्या डस्टबिनमध्ये टाका.
* रूग्णाची रूम स्वत:ची योग्य ती काळजी घेऊन नियमित स्वच्छ करा. भांडी, टॉवेल, साबण, ब्रश वेगळे ठेवा. कपडे वेगळे धुवा. रूग्णाचे कोणतेही काम केल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा.
* रूग्णाची सर्व कामे करताना ग्लव्हज वापरा. आपले हात नाक, डोळे, तोंडाला लावू नका.
* रूग्ण ज्या खोलीत आहे तिथे योग्य व्हेटिलेशन ठेवा, दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवा.
* रूग्णासाठी डिस्पोजेबल भांडी वापरणे सोपे होऊ शकते. ही भांडी डस्टबिनमध्ये टाका.
* निरोगी असाल तरच रूग्णाची देखभाल करा. स्वत: डबल मास्क घाला.
* दिवसातून दोन वेळा गरम पाण्याने गुळण्या करा.
* रूग्णाची देखभाल करताना फेस शील्ड वापरणे जास्त सुरक्षित ठरू शकते.
* वेळोवेळी स्वत:ला सॅनिटाइज करा, वारंवार हात धुवा. रोज स्वत:चा ताप आणि ऑक्सीजन लेव्हल चेक करा.