XraySetu service : एक्सरे सेतुद्वारे दुर्गम भागात सुद्धा होईल कोविड-19 चे निदान, जाणून घ्या कसे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शहरांमध्ये कोरोनाचा उपचार करण्यासाठी सर्व सुविधा आहेत, परंतु गावांमध्ये आणि दुर्गम भागांमध्ये या आजाराने पीडित रुग्णांचे निदान करणे आणि त्यांच्यावर उपचार करणे सोपे काम नाही. लोकांची ही समस्या लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी ऑर्टिफिशियल इन्टलिजन्सच्या मदतीने कोरोना संसर्गाचे निदान करणे सोपे केले आहे. या प्रक्रियेचे नाव ‘एक्स-रे सेतु’ XraySetu ठेवले आहे. ज्यामध्ये कमी रिझोल्युशनचा फोटो मोबाइलद्वारे पाठवला जाऊ शकतो. या द्वारे वेगाने चाचणी करणे आणि ग्रामीण परिसरात संसर्गाचा लवकर शोध घेण्यास मदत होईल.

बेंगळुरुच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सच्या सहकार्याने हेल्थटेक स्टार्टअपने एक्स-रे सेतूची निर्मिती केली आहे.
यामध्ये रुग्णाच्या एक्सरेचा फोटो एक्सरे सेतुवर XraySetu व्हॉट्सअपद्वारे एका नंबरवर पाठवावा लागतो.
ऑर्टिफिशियल इन्टेलिजन्सच्या मदतीने पाहिले जाते की, फुफ्फुसात कोरोना संसर्ग आहे किंवा नाही. रिपोर्टची दोन पाने डॉक्टरांकडे पाठवली जातात.

एक्स-रे सेतूद्वारे कमी रिझोल्यूशनच्या छायाचित्राद्वारे सुद्धा डॉक्टर आजाराचा शोध घेऊ शकतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने बुधवारी ही माहिती दिली. याद्वारे आता भारताच्या दुर्गम भागातून 1200 पेक्षा जास्त रिपोर्ट मिळाले आहेत.

एक्सरे सेतु सेवा कशी करते काम :
रूग्णाच्या आरोग्याची चाचणी करण्यासाठी कोणत्याही डॉक्टरांना एका वेबसाइटवर जाऊन ‘ट्राय द फ्री एक्स-रे सेतू बीटा’ बटन क्लिक करायचे आहे.
त्यानंतर हा प्लॅटफार्म त्यांना थेट दुसर्‍या पानावर घेऊन जाईल, जिथे संबंधीत डॉक्टर वेब किंवा स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशनद्वारे व्हाट्सअ‍ॅप आधारित चॅट-बोटशी जोडला जाईल.
याशिवाय डॉक्टर एक्स-रे सेतु सेवा सुरू करण्यासाठी एका नंबरवर व्हॉट्सअप मेसेज पाठवू शकतात.
त्यांना केवळ रूग्णाच्या एक्स-रे इमेजला क्लिक करायचे आहे आणि काही मिनिटातच संबंधित छायाचित्र आणि निदानची संपूर्ण माहिती देणारी दोन पाने येतील.

एक्सरे सेतु सेवेचे मुल्यांकन :
ब्रिटनच्या राष्ट्रीय संस्थेने 1,25,000 पेक्षा जास्त एक्स-रे छायाचित्रांना या प्रक्रियेत तपासले आहे. अशाप्रकारे ‘एक्स-रे सेतु’ द्वारे एक हजारपेक्षा जास्त भारतीय कोविड रुग्णांची माहिती मिळवली आहे.
या प्रक्रियेचे चांगले परिणाम मिळाले आहेत.
या प्लॅटफार्मवरून कोविडशिवाय टीबी, निमोनियासह फुफ्फुसांसंबंधी 14 इतर आजारांचा सुद्धा शोध घेतला जाऊ शकतो.
याचा वापर एनालॉग आणि डिजिटल एक्स-रे, दोन्ही रूपात केला जाऊ शकतो.
मागील 10 महिन्यांच्या दरम्यान ग्रामीण भागातमध्ये कार्यरत 300 पेक्षा जास्त डॉक्टरांनी याचा यशस्वी वापर केला आहे.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे