Coronavirus : मुलांमध्ये कोरोनाची ‘नॉर्मल’, ‘मॉडरेट’ आणि ‘गंभीर’ स्थिती ओळखून कसा करावा त्यांच्यावर उपचार, जाणून घ्या

नवी दिल्ली : भारत सरकारने मुलांमध्ये कोरोनाची (Coronavirus) लक्षणे, लक्षणांच्या आधारावर त्यांची देखभाल आणि उपचार याबाबत गाईडलाईन जारी केली आहे. मुलांमध्ये कोरोनाची (Coronavirus) कोण-कोणती लक्षणे दिसून येतात, कधीपर्यंत त्यांच्यावर घरीच उपचार करता येऊ शकतात, त्यांच्या आई-वडीलांनी कोण-कोणती काळजी घ्यावी, याबाबत सर्वकाही जाणून घेवूयात…

हलकी लक्षणे असलेल्या मुलांची देखभाल कशी करावी?
– घरातच मुलाची ऑक्सीजन लेव्हल आणि ताप चेक करत रहा. शक्य असेल तर एक चार्ट बनवा, ज्यामध्ये ताप येण्याची वेळ, दिवसात किती वेळा ताप आला, शरीराचे तापमान हे सर्व नोट करा.
– तापात तुम्ही पॅरासिटामॉल देऊ शकता. घशाची खवखव दूर करण्यासाठी कोमट पाण्याने गुळण्या करा.
– अतिसाराची समस्या झाल्यास शरीराचे न्यूट्रिशन कायम राखण्यासाठी नारळपाणी किंवा ज्यूस द्या. डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणतेही अँटीबायोटिक देऊ नका.
– या दरम्यान कोणतीही टेस्ट करण्याची आवश्यकता नाही.

मध्यम लक्षणे असलेल्या मुलांची देखभाल कशी करावी?
– या मुलांमध्ये ब्रिथिंग रेट जास्त असतो. अशावेळी मुलास जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा.
– आता मुलांना लिक्विड डाएट देणेच चांगले ठरेल. छोट्या मुलांसाठी आईचे दूध चांगले आहे.
– जर मुल जेवत नसेल तर फ्यूएड थेरेपी सुद्धा सुरू केली जाऊ शकते.
– ऑक्सीजन लेव्हल घसरली तर ऑक्सीजनची सुद्धा गरज असेल.

गंभीर मुलांचा उपचार कसा होईल?
– ऑक्सीजनची लेव्हल जर 90 च्या खाली आली तर हे गंभीर इन्फेक्शन म्हटले जाते.
– अशावेळी मुलाला श्वास घेण्याचा त्रास होतो, चेस्ट पेन होतो, सोबतच जास्त झोप सुद्धा येते.
– या दरम्यान ऑर्गन फेल्युरचा सुद्धा धोका असतो.
– चेस्ट एक्स-रे, सीबीसी, किडनी आणि लिव्हर फंक्शनची चाचणी आवश्यक आहे.
– लिव्हर आणि किडनीमध्ये कोणतेही इन्फेक्शन असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रेमडेसिविर दिले जाऊ शकते.

Also Read This : 

 

 

वॅक्सिंग आणि शेव्हिंग नाही, सुंदर पाय दिसण्यासाठी करा ‘हे’ 6 उपाय

 

आता दररोज 1 कोटी लोकांना दिली जाईल कोरोनाची व्हॅक्सीन ! सरकार तयार करतंय नवीन योजना
चुकून देखील बाथरूम मध्ये ‘ही’ गोष्ट करू नका, होऊ शकता ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

 

अमेरिकन शास्त्रज्ञांचा मोठा इशारा, म्हणाले – ‘कोरोनाचा उगम शोधा, नाहीतर कोविड-26, कोविड-32 साठी तयार रहा’

 

रोगप्रतिकारकशक्ती ला नष्ट करतोय ‘हा’ आहार, जाणून घ्या