Diet Mistakes : तुम्हीही ‘या’ 6 पदार्थांना हेल्दी समजून स्वतःचं वजन वाढवत तर नाहीत ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आरोग्याबाबत जागरूक लोक त्यांच्या आहाराबद्दल खूप सतर्क असतात. त्यांना असा आहार घ्यायचा असतो, ज्यामुळे ते नेहमी फिट राहतील. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या आहारात कॅलरी आणि फॅटची नोंद ठेवतात. पण असे लोक हेल्दी आहारामुळे त्यांच्या आहारात अशा काही गोष्टी समाविष्ट करतात, ज्यामुळे त्यांचे वजन वाढते. तुम्हीही आहारामध्ये निरोगी समजून असे पदार्थ वापरत नाही ना, जे तुमचे वजन वाढवत आहे. कोणत्या गोष्टी तुमचे वजन वाढवू शकतात, हे जाणून घेऊया…

व्हाईट ब्रेड
ब्रेड एक महत्त्वपूर्ण ब्रेकफास्ट फूड आहे. ब्रेडमुळे आरोग्याला हानी होत नाही. मात्र ब्रेड बऱ्याच प्रकारचे असतात, पण व्हाईट ब्रेड तुमचे वजन वाढवण्यासाठी जबाबदार आहे. व्हाईट ब्रेड रिफाईन्ड असतो, ज्यामुळे आपल्या शरीरात चरबी वाढू शकते. बरेच लोक नकळत त्याचे नुकसान माहित नसताना त्याचा वापर करत आहेत.

बटाटा
बटाटा आपल्या जेवणातील एक महत्वाचा पदार्थ आहे, जो बहुतेक लोकांना खायला आवडतो. तुम्हाला माहित आहे का की, बटाट्याचा जास्त वापर केल्याने तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो. बटाट्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण असते, जे शरीराला ऊर्जा देते, तसेच वजनही वाढवते.

अंड
अंड आपल्याला दररोज नाश्त्यात खायला आवडते. अंड्यामध्ये चरबी आणि कॅलरी जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे रोज खाल्ल्याने तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की, अंड खाऊन तुम्ही निरोगी राहत असाल तर तुमची सवय बदला. अंड तुमचा लठ्ठपणा वाढवत आहे.

केळी
हेल्थ कॉन्शियस लोकही न्याहारीत केळी खाणे पसंत करतात. त्यांचा विश्वास आहे की, केळी त्यांचे शरीर मजबूत ठेवते. पण तुम्हाला माहिती आहे की, केळीनेही वजन वाढते. केळीमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरी असतात, ज्यामुळे चरबीसह वजन देखील वाढते. केळीमध्ये पोषक घटक असतात यात काही शंका नाही, पण केळी अशक्त लोकांसाठी फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारामधून केळी वगळा.

बदाम
बदाम आरोग्यासाठी आणि मेंदूसाठी फायदेशीर असतात. ते खाल्ल्याने शरीरालाही बरेच फायदे मिळतात. पण बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते.

हरभरा
बर्‍याचदा ब्रेकफास्टमध्ये आपण हरभरा हेल्दी समजून खातो, पण आपले वजन वाढवण्यासाठी हरभरा देखील जबाबदार आहे. तुम्ही हरभरा हेल्दी समजून दररोज तो न्याहारीत खात असाल, तर आपली सवय बदला.