Diet To Relieve Fatigue : जर तुम्हाला सतत ‘सुस्तपणा’ आणि ‘थकवा’ जाणवत असेल तर ‘या’ 5 गोष्टी आहारात समाविष्ट करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – काही लोक थोडेसे काम केले तरी थकतात, सकाळी झोपेतून उठल्यानंतरही त्यांना थकवा जाणवतो. जास्त शारीरिक श्रम न करताही त्यांना थकवा येतो. या थकव्याचे कारण म्हणजे आपल्या शरीरातील पोषक तत्वांचा अभाव. कधीकधी थकवा झोपेच्या कमतरतेमुळे देखील येतो, परंतु नेहमी थकवा असणे हे अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखे असते.

थकवा अशक्तपणा, थायरॉईड, मधुमेह, फुफ्फुस आणि हृदयविकारामुळे देखील येऊ शकतो. आपल्याला असा कोणताही आजार नसल्यास सर्व प्रथम आपल्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपण अशा गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत, ज्यामुळे आपला आळशीपणा कमी होतो, तसेच आपल्या शरीरातील उर्जा टिकून राहू शकेल. आज आपण अशा खाद्य पदार्थांबद्दल जाणून घेऊया ज्यांच्यामुळे तुमचा थकवा, आळशीपणा आणि सुस्तपणा कमी होईल.

आहारात केळीचा समावेश :
केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीरातून सुस्ती, थकवा काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या आहारात केळीचा समावेश करा.

डाळिंबाचे सेवन करा :
डाळिंब शरीरातून अशक्तपणा कमी करतो. डाळिंबाचे सेवन केल्यास अशक्तपणा आणि थकवा दूर होतो. त्यामुळे दररोज डाळिंब खाल्ल्याने शरीरातील थकवा नाहीसा होतो.

आहारात देशी तुपाचा समावेश करा :
देशी तूप शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, याचा सतत वापर केल्यास वजन वाढत नाही. तूप खाल्ल्याने अशक्तपणा व थकवा दूर होतो. देशी तुपाचे सेवन केल्यास शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते.

आपल्या आहारात पालक घ्या :
आपल्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास कोणत्याही कामात मन लागत नाही किंवा नेहमी थकल्यासारखे जाणवते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी लोहयुक्त आहार घ्यावा. त्यासाठी आपण आपल्या आहारात पालक आणि इतर हिरव्या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. पालकाचा वापर केल्याने आपल्या शरीराला उर्जा मिळेल आणि आळसपणा दूर होईल.

रोज तुळशीचा वापर करावा :
तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळशी थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यात खूप उपयुक्त आहे. तुळशीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारते तसेच आपल्या शरीरास अनेक रोगांवर लढण्यास मदत करते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like