Oatmeal Health Benefits : पूर्ण दिवसभर रहायचंय एनर्जेटिक तर नाष्टयात दलियाचा करा सामावेश, होतील ‘हे’ 7 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सकाळचा नाश्ता असा हवा की, जो संपूर्ण दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक ठेवू शकतो आणि वजनसुद्धा नियंत्रित ठेवू शकतो. सकाळच्या नाश्त्यात दलिया बेस्ट ऑपशन आहे. दलिया तुम्ही आवडीनुसार गोड किंवा नमकीन कसाही बनवू शकता. गोड खायचे नसेल, त्यांनी नमकीन दलिया खावा.

हे आहेत फायदे

1 पचनक्रिया सुधारते
2 वजन वाढत नाही
3 शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर होते
4 लो कॅलरी आणि फायबरचा शरीराला लाभ होतो
5 ब्लड प्रेशर नियंत्रित राहते
6 कोलेस्ट्रोल नियंत्रित राहते
7 दिवसभर शरीर एनर्जेटिक राहते

गोड दलिया

सर्वप्रथम कुकरमध्ये गावठी तूप टाका आणि गरम करा. आता दलिया कुकरमध्ये टाकून परतून घ्या. चांगले परतून घेतल्यावर त्यामध्ये तीन-चार हिरवी वेलची आणि दूध टाकून कमी आचेवर शिजवा. चांगल्याप्रकारे शिजल्यावर थोडी साखर टाका आणि पुन्हा शिजवा. थंड झाल्यानंतर नाश्त्यात खा.

नमकीन दलिया

सर्वप्रथम कडईत थोडे तूप गरम करून त्यामध्ये दलिया टाकून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या आणि बाजूला ठेवून द्या. यानंतर कडईमध्ये तूप गरम करून, नंतर कापलेला कांदा तांबूस होऊपर्यंत परतून घ्या आणि त्यामध्ये थोडी आलं-लसूण पेस्ट टाकून एक मिनिटासाठी पुन्हा परतून घ्या. आता कडईत मीठ आणि काळी मिरीसोबत उकडलेल्या भाज्या आणि अगोदरच परतवून ठेवलेले दलिया, पाणी टाकून चांगले मिक्स करा आणि 10-15 मिनिटांसाठी झाकण ठेवून कमी आचेवर शिजू द्या. शिजल्यानंतर नाश्त्यात खा. नमकिन दलियासोबत दूध सेवन करू नका.