Lifestyle changes : तुमची जीवनशैली तुम्हाला हायपरटेन्शनचा रुग्ण बनवण्याआधी जाणून घ्या ‘कसा’ करावा ‘डायट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जीवनशैलीमध्ये अनेक वाढत्या त्रासांमुळे लोक तरुण वयातच आजारपणाचे शिकार होत आहेत. ब्लडप्रेशर किंवा उच्च रक्तदाब हा असाच आजार आहे ज्याने वयाचे अंतर ओलांडले आहे. आज, उच्च ब्लडप्रेशरने लहान वयातच लोकांना आपले शिकार बनवले आहे. हायपरटेन्शन हा उच्च रक्तदाब आणि उच्च बीपीची समस्या आहे ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब वाढतो. या दाबाच्या वाढीसह, रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी हृदयाला अधिक कार्य करण्याची आवश्यकता असते. आरोग्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जर रक्तदाब 120/80 mmHg मिमी एचजीपेक्षा जास्त असेल तर ती व्यक्ती हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब या श्रेणीत येते. उच्च रक्तदाब कोणत्याही वेळी शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो, परंतू यामुळे हृदयाला सर्वात जास्त नुकसान पोहचते.

लोकांमध्ये हायपरटेन्शनची अनेक कारणे आहेत, जसे की लठ्ठपणा, झोपेची कमतरता, लवकर राग येणे, तेलकट पदार्थांचा जास्त वापर. एवढेच नव्हे तर, उच्च रक्तदाब असलेल्या बर्‍याच व्यक्तींमध्ये थकवा आणि आळशीपणाची लक्षणे देखील आढळतात. आपल्यालाही हा आजार टाळायचा असेल तर तुमची जीवनशैली सुधारली पाहिजे आणि आम्ही खाली दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे प्रयोग केले पाहिजे.

– शरीराला निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. जर आपल्याला बीपीमध्ये त्रास होत असेल तर कमीतकमी 15 मिनिटे चालणे गरजेचे आहे.

– हाय बीपी रूग्णांनी नियमितपणे त्यांचे ब्लड प्रेशन तपासायला हवे. डॉक्टरांच्या मते, जर बीपी जास्त असेल तर बीपीचे औषध घ्या.

– जंक फूड खाणे टाळा. जर तुमचा बीपी हाय असेल तर अल्कोहोल आणि तंबाखूचे सेवन अजिबात करू नका.

– आपल्याला उच्च बीपीची समस्या असल्यास संतुलित आहार घेण्याची सवय लावा. अन्नामध्ये फळे आणि हिरव्या भाज्या खा.

– जर तुम्हाला जास्त मीठ खाण्याची सवय असेल तर ही सवय बदला. मीठ आपला बीपी आणखी वाढवू शकतो. दिवसातून फक्त 5-6 ग्रॅम मीठ वापरा.

– हायपरटेन्शनमध्ये हृदयविकाराचा झटका येण्यासह अनेक विविध समस्या येऊ शकतात. जसे की, किडनी खराब होणे, डोळ्यांना त्रास होणे इत्यादी. या व्यतिरिक्त यांच्या रक्तवाहिन्यात रक्त साचू शकते किंवा मेंदूत रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. म्हणून, आपण तळलेले पदार्थ खाणे टाळावे आणि संतुलित आहार घ्यावा.