मजबूत इम्यून सिस्टम मिळवण्यासाठी नियमित करा ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस महामारीदरम्यान लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे. कारण ज्या लोकांची इम्यून सिस्टम मजबूत आहे, त्यांना कोरोना व्हायरसचा धोका कमी आहे. तर कमजोर इम्युनिटी असणार्‍या लोकांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका असतो. जर तुम्हाला सुद्धा आपली इम्युन सिस्टम मजबूत ठेवायची असेल, तर ह 5 उपाय करू शकता. जाणून घेवूयात –

1 योग जरूर करा
जर तुम्ही वर्कआऊट करू शकत नसाल, तर योग करू शकता. यासाठी बालासन, सेतुबंधासन, धनुरासन आणि शलभासन करू शकता. यामुळे तुमच्या मसल्सना आराम मिळेल. संपूर्ण शरीरात रक्तसंचार होईल.

2 ऑईल पुलिंग करा
आयुष मंत्रालयानुसार, इम्यून सिस्टम मजबूत करण्यासाठी ऑईल पुलिंग करा. ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे. ही केल्याने तोंडा बॅक्टेरियामुक्त राहाते. ही सकाळी रिकाम्यापोटी केली जाते. यासाठी शुद्ध खोबरेलतेल 4-6 मिनिटापर्यंत ठेवून गुळणी करावी लागते. इम्यून सिस्टम मजबूत करण्यासाठी ऑईल पुलिंग करू शकता.

3 शरीर हायड्रेट ठेवा
यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. हे तुम्ही लिंबू, मध, हळद टाकून सुद्धा सेवन करू शकता.

4 एक्सरसाइज करा
रोज अर्धा तास एक्सरसाइज केल्याने अनेक आजार दूर राहतील. यामुळे इम्यून सिस्टम सुद्धा मजबूत होईल. सामान्य एक्सरसाइज वॉकिंग, जॉगिंग, सायकिलिंगने सुरूवात करू शकता.

5 सकाळचा नाश्ता
सकाळचा नाश्ता खुप महत्वाचा असतो. तो टाळू नका. नाश्त्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन, कार्ब्स आणि फायबर युक्त पदार्थ सेवन करा. सोबतच ताजी फळे, कडधान्य आणि भाज्यांचा नाश्त्यात समावेश करा.

डिस्क्लेमर : स्टोरीतील टिप्स आणि सल्ला सामान्य माहितीसाठी आहे. ते कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याप्रमाणे घेऊ नये. आजार किंवा संसर्गाच्या लक्षणांच्या स्थितीत डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.