जलदगतीने वजन कमी करायचे आहे, तर फॉलो करा Mediterranean Diet

नवी दिल्ली : खराब लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे सध्या अनेक प्रकारचे आजार जन्म घेत आहेत, ज्यामध्ये लठ्ठपणा एक आहे. लठ्ठपणातून अनेक आजार निर्माण होतात. यामध्ये डायबिटीज, सांधेदुखी, उच्च रक्तदाब आणि ह्रदयरोगांचा समावेश आहे. हा एक अनुवंशिक आजार आहे, जो पिढ्यानपिढ्या चालत राहतो. याशिवाय, जंक फूडच्या अतिसेवनाने सुद्धा वजन वाढते. यासाठी डाएटमध्ये कमी कॅलरीज घ्या.

तज्ज्ञांनुसार, केवळ खाण्यापिण्याकडे लक्ष दिल्याने वजन कमी होऊ शकत नाही. यासाठी एक्सरसाईज आवश्यक आहे. तसेच रोज वॉकिंग आणि जॉगिंगचा आधार घेऊ शकता. सोबतच वर्कआउट आवश्य करा. जर तुम्ही सर्व उपाय करून थकला असाल, आणि यश मिळत नसेल तर Mediterranean Diet चा आधार घेऊ शकता. हे डाएट कसे आहे आणि कशाप्रकारे वजन कमी करण्यात उपयोगी आहे ते जाणून घेवूयात…

Mediterranean Diet काय आहे
या डाएटमध्ये फल, भाज्या, कडधान्य, सीफूड खाण्याचा सल्ला दिला जातो. चिकन आणि अंडे सुद्धा या डाएटचा भाग आहे. सोबतच रेड मीट मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला जातो. तसेच, चीनी, प्रोसेस्ड फूड्स, रिफाइंड ऑईल इत्यादी वस्तूंपासून दूर राहा. तसेच मर्यादित प्रमाणात अल्कोहल सेवन करू शकता. हे डाएट सर्वांसाठी फ्लेक्सिएबल आहे. यासाठी Mediterranean Diet ट्रेंडिंग मध्ये आहे.

Mediterranean Diet चे फायदे

* वजन कमी करण्यासाठी Mediterranean Diet वरदान आहे. या डाएटने वाढते वजनावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.
* स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होता.
* डायबिटीजचा धोका कमी होतो.
* Mediterranean Diet ने सूज कमी होते.

डिस्क्लेमर : स्टोरीच्या टिप्स आणि सल्ला सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याप्रमाणे घेऊ नये. आजर किंवा संसर्गाच्या स्थितीत डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.