‘लिफ्ट’मध्ये किंवा ‘पायर्‍या’ चढताना अशा प्रकारे स्वत:ला ‘कोरोना’पासून वाचवा, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोनाच्या कहरामुळे लोकांमध्ये इतकी भिती पसरली आहे की लोक आपल्या भीतीपोटी घरातून बाहेर देखील पडत नाहीत. परंतु एखाद्या कठीण समयी किंवा आवश्यक गरजेसाठी घरातून बाहेर पडावेच लागते. आपण घरातून बाहेर पडण्यासाठी लिफ्ट किंवा पायऱ्यांचा वापर करत असाल तर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण लिफ्ट आणि पायऱ्या चढताना कोरोना संसर्गाचा धोका अजूनही वाढू शकतो. कारण आपल्या अगोदर बर्‍याच लोकांनी लिफ्टच्या बटणाचा वापर केलेला असतो, आणि या बटणावर कोरोना विषाणू असण्याची शक्यता दाट असते.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लिफ्ट वापरताना टूथपिक, इअरबड किंवा टिश्यू पेपरच्या सहाय्याने लिफ्ट बटण दाबा. नंतर वापरलेले टूथपिक, इअरबड किंवा टिश्यू पेपर फेकून द्या आणि आपले हात स्वच्छ करा. आपण पायर्‍या वापरत असल्यास पायऱ्यांच्या रेलिंगला स्पर्श करणे टाळावे. कारण कोरोना-संक्रमित व्यक्तीने हँड्रेल रेलिंगला स्पर्श केला असेल. तर यामुळे तुम्हाला कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. जर आपण रेलिंगला स्पर्श केला असेल तर घरी येताच आपले हात साबणाने स्वच्छ धुवा.

काही कारणास्तव आपल्याला रुग्णालयात किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जावे लागत असेल तर आपण लिफ्ट न वापरण्याचा प्रयत्न करा. जरी लिफ्ट वापरत असला तरीही, लिफ्ट बटणावर स्पर्श करू नका. जर लिफ्टमध्ये एकापेक्षा जास्त लोक असतील तर आपला चेहरा मागील दिशेने करून लिफ्टचा वापर करावा.

जर आपण लिफ्ट वापरत असाल तर घरातून बाहेर पडताना आपल्या हातात हातमोजे घाला. हातमोजे घालून आपण लिफ्टचे बटण दाबले किंवा पायऱ्यांच्या रेलिंगला धरले तर आपल्याला कोरोना विषाणूचा धोका होणार नाही. घरी आल्यावर सर्व प्रथम हातमोजे काढावे आणि हात स्वच्छ धुवावेत.