Health in Your Hands : Corona सह गंभीर आजारांचा संकेत देतात तुमचे हात, असा घ्या शोध

लंडन : कोरोना व्हायरसचे निदान असे तर लक्षणांवरून होते, परंतु एखाद्या व्यक्तीची नखं पाहून सुद्धा शोध घेतला जाऊ शकतो की त्यास संसर्ग झाला होता किंवा नाही. किंग्ज कॉलेज लंडनचे महामारी तज्ज्ञ प्रोफेसर टिम स्पेक्टर यांचे म्हणणे आहेत की, कोरोनातून रिकव्हर होणार्‍यांची नखे ( nails)  विचित्र प्रकारे वाढतात, यामध्ये स्पष्ट रेषा दिसू शकते यास कोविड नेल्स म्हटले जाते. मात्र, केवळ कोविडच नव्हे तर हात आणि नखे ( nails) दुसर्‍या गंभीर आजारांचे सुद्धा संकेत देऊ शकतात.

‘द सन’ने डॉक्टरांच्या संदर्भाने सांगितले की, जर तुमच्या हातावर लाल आणि जांभळ्या रंगाची गाठ किंवा डाग तयार झाले तर यास स्कीन प्रॉब्लेम समजून दुर्लक्ष करू नका. हा हृदयाशी संबंधीत गंभीर आजारांचा संकेत सुद्धा असू शकतो. डॉ अमुथन यांच्यानुसार, लाल किंवा जांभळ्या रंगाची गाठ किंवा डाग एंडोकार्टिटिस नावाच्या हार्ट इन्फेक्शन असू शकते. एंडोकार्डिटिस हृदयाच्या व्हॉल्व आणि लायनिंगचा संसर्ग असतो, ज्याचा उपचार अँटीबायोटिक औषधाने केला जातो.

रिपोर्टनुसार, जर तुमची पकड कमजोर पडत असेल जसे की जार उघडण्यास त्रास, एखादी वस्तू पकड्यात अडचण होत असले तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क करा. हे रूमेटाईड अर्थरायटिस (गाठ) सह अल्जायमरचा सुद्धा संकेत असू शकतो. डकोटा विद्यापीठाच्या तज्ज्ञांना आढळले की, ग्रीप स्ट्रेंग्थ प्रत्येक 5 किलोच्या कमतरतने संज्ञानात्मक क्षमतेत घसरणीचा धोका 18 टक्के वाढतो.

जर तुमच्या नखांमध्ये काळी रेषा दिसत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका याची तपासणी करा, कारण हा मेलानोमा आजाराचा संकेत असू शकतो. जो सर्वात घातक कॅन्सर आहे. याशिवाय, काळी रेषा गाठ आणि एचआयव्हीचे सुद्धा लक्षण असे शकते. मात्र, या रेषा काही औषधांमुळे सुद्धा येतात, ज्यामध्ये किमोथेरेपी, बीटा ब्लॉकर्स आणि मलेरिया-प्रतिबंधक औषधांचा समावेश आहे. डॉ. अमुथन यांनी म्हटले की, मेलानोनिचिया नखांचा भूरा-काळा रंग आहे, जो लाईन किंवा बँडच्या रूपात होऊ शकतो.

Also Read This : 

 

साखर खाण्या ऐवजी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, गोड खाणं सोडल्याशिवाय मधूमेह अन् वजन वाढण्यापासून राहा दूर, जाणून घ्या

केमिकल टँकर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू

Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

पंतप्रधानांना भावनिक प्रश्न, ’छोट्या मुलांना इतके काम का दिले Modi साहेब’, Video पाहताच अ‍ॅक्शनमध्ये Governor

‘हे’ केल्यानं मान, गुडघे अन् कोपराचा काळेपणा होईल दूर, जाणून घ्या