एक्सपर्टकडून जाणून घ्या, कोरोना काळात आत्महत्यांच्या घटना वाढण्याचे कारण काय ?

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीमुळे आत्महत्यांच्या घटना वाढू लागल्या आहेत. याची अनेक करणे असू शकतात, परंतु मुख्य कारण आहे नैराश्य आणि तणाव. तणाव एक मानसिक आजार आहे. या आजारात व्यक्ती नकारात्मक आणि काल्पनिक जगात जगू लागतो. जेथे केवळ आणि केवळ अंधार पसरलेला असतो. तर व्यक्ती पूर्णपणे हताश आणि निराश होते. त्याच्या मनात आणि मेंदूत फक्त नकारात्मक विचार उसळत राहातात.

तज्ज्ञांच्या मतानुसार, यावर उपचार शक्य आहेत. मात्र, दुर्लक्ष केले तर हे धोकादायक ठरू शकते. या आजारातून बाहेर पडणे सोपे नसते. व्यक्तीला आतून मजबूत व्हावे लागते. व्यक्तीला सामाजिक सक्रियता वाढवली पाहिजे. सध्या मानसिक आजाराची कोणतीही तपासणी उपलब्ध नाही. यासाठी जागृतता आणि आपलेपणाच सुरक्षा कवच आहे. जर तुम्हाला सुद्धा कोरोना काळात तणाव जाणवत असेल तर आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. कोरोना काळात आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे कारण काय आहे, ते तज्ज्ञांकडून जाणून घेवूयात –

डॉ. ज्योती कपूर, सीनियर सायकेट्रिस्ट, पारस हॉस्पीटल, गुरुग्राम यांचे म्हणणे आहे की, कोरोना काळात मेन्टल हेल्थ आजाराच्या केसेस जवळपास दुप्पटीने वाढल्या आहेत. सायकेट्री ओपीडीत 25% ऑब्सेशन्सच्या नव्या केसेस आणि 50% पेक्षा जास्त केस एंग्झायटीच्या आहेत. सायकोसोमेटिक मॅनिफेस्टेशन (मनोविकाराचे रूप) सुद्धा वाढत आहे. यावरून समजते की, कशाप्रकारे कोरोना व्हायरस महामारी आपल्या मानसिक आरोग्याला घातक ठरत आहे. मोठ्या कालावधीसाठी आयसोलेशन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या उपायांनी जुन्या/प्री एक्सिजिस्टिंग रूग्णांची स्थिती खराब होत आहे.

इतके की, त्या रूग्णांमध्ये डिप्रेशनची लक्षणे दिसत आहेत, जे अगोदर सामान्य होते. परंतु लोक या स्थितीतून बाहेर येण्यासाठी मेंटल हेल्थ एक्सपर्टची मदत घेत आहेत. कारण मेंटल हेल्थसंबंधी चिंतांचे कारण मेंटल हेल्थबाबत जागृतता वाढली आहे आणि सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसारख्या दुर्दैवी घटनांनी याच्या भीषण सत्यावर प्रकाश टाकला आहे. यातून समजते की, कुणीही सायकेट्रिक समस्येला अपवाद नाही. जेव्हा मेंटल हेल्थची बाब येते तेव्हा रूग्ण फिजिकल एग्झामिनेशनपेक्षा जास्त टेली कन्सल्टेशनला प्राथमिकता देतात. आमच्याकडे दरदिवशी 10 ते 12 टेलीकॉन्स्लेशन रिक्वेस्ट येत आहेत.

यामध्ये 19 ते 40 वर्षांच्या रूग्णांचा समावेश जास्त असला तरी इतरही वयाचे रूग्ण आहेत. नोकरी जाणे, जवळच कोविड रूग्ण सापडणे, लॉकडाऊनमुळे मित्र, कुटुंबिय यांच्यापासून लांब राहावे लागले, यामुळे मानसिक आजार होत आहेत. कोविडच्या भितीमुळे अति स्वच्छतेमुळे ऑब्सेसिव्ह-कम्पलसिव्ह डिसऑर्डर सुद्धा होऊ शकतो.