Colon Infection Prevention : कोलन संसर्ग रोखण्यासाठी आपल्या डाएटमध्ये ‘या’ 7 फूड्सचा करा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोलन म्हणजेच मोठ्या आतड्याचे इन्फेक्शन एक असा आजार आहे, ज्यामध्ये कोलनच्या बाहेरील भागावर सूज येते, आणि मोठे आतडे संक्रमित होते. जर हा आजार लवकर बरा झाला नाही तर यामुळे कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वाढतो. कोलन इन्फेक्शनमुळे पोटदुखी, डायरिया, पोटात कळ, बद्धकोष्ठता, गॅस, थकवा, कमजोरी, स्टूल पास होण्यास अडचण आणि जळजळ इत्यादी समस्या होतात. नॅशनल सेंटर फॉर बायो टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार, मोठ्या कालावधीपर्यंत दुषित अन्न किंवा दुषित पाणी पिणे हे यामागील कारण आहे. या आजाराचा आणि खाण्यापिण्याशी जवळचा संबंध आहे. यासाठी कोणते पदार्थ सेवन करावे ते जाणून घेवूयात…

पपई :
पपईमध्ये लुब्रिकेंट आणि एंजाइम असतात जे कोलनला स्वच्छ करते आणि निरोगी ठेवते.

आंबा :
आंब्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचन चांगले होते आणि मोठे आतडे स्वच्छ राहते.

अळशीचे बी :
अळशीच्या बीमध्ये पोषक तत्व आणि फायबर भरपूर असल्याने कोलन तंदुरुस्त राहते. विषारी घटक दूर होतात. प्रायव्हेट पार्टला संसर्गापासून वाचवते.

सफरचंद :
सफरचंदमध्ये उच्च-फायबरसह कॅन्सर विरोधी गुण आढळतात. जे कोलन संसर्गापासून वाचावतात आणि विषारी घटक दूर करतात.

लवंग :
लवंगमध्ये अँटीऑक्सीडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुण असल्याने कोलनमधून टॉक्सिन्स दूर होतील आणि पोटाचा अल्सर रोखण्यात मदत होते.

एलोवेरा/कोरफड :
एलोवेरा डिटॉक्सीफायर असल्याने कोलनला हेल्दी ठेवते. कोलनमध्ये जमा घाण स्वच्छ करते.

भोपळ्याचे बी :
यामध्ये अँटीऑक्सिडेंट असल्याने ब्लॅडर निरोगी राहते. आतड्या स्वच्छ आणि निरोगी राहतात.

पाण्याचे सेवन :
कोलन संसर्गापासून वाचण्यासाठी भरपूर पाणी प्या. आहारात पेय पदार्थ जसे की, दूध, फळांचा ज्यूस, दही, ताक, लिंबू पाणी यांचा समावेश करा.