Energy Boosting Breakfast : ‘या’ 4 गोष्टींचा समावेश तुमच्या नाष्ट्यात करा, दिवसभर तंदुरुस्त राहा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्या आपली जीवनशैली अशी झाली आहे की आपण नाष्टा करताना फक्त पोट भरेल असंच काहीतरी खातो. खराब डायट आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा शिकार होऊ शकतो. आपल्या खाण्यातून आपल्याला पोषक घटक मिळाले पाहिजे. त्यामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वात आधी चांगल्या पोषक पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे. या तर जाणून घेऊ कोणते पदार्थ तुमच्या नाष्ट्यात समाविष्ट केले पाहिजेत.

उपाशीपोटी मध खावे

सकाळी उठून फ्रेश झाल्यावर सर्वात आधी मध खाल्ले पाहिजे. मध अँटी ऑक्सिडेंट युक्त असते. ते उपाशीपोटी खाल्ल्याने तुमची प्रतिकार शक्ती वाढते. सोबतच तुम्हाला एनर्जी देखील मिळते. जर तुम्हाला भूक कमी लागत असेल तर, रोज मध सेवन करा. कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून सकाळी घ्या. तुम्ही मधासोबत लिंबू देखील घेऊ शकता.

आवळा खाणं उपयुक्त

नाष्ट्यामध्ये आवळा खाणे चांगले असते. तुम्ही आवळ्याचा मुरंबा बनवून देखील खाऊ शकता. आवळ्याला वाळवून ते देखील खाऊ शकता. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असते. आवळा खाल्ल्याने इम्युनिटी पॉवर वाढण्यास मदत होते. आवळा पावडर केस आणि त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे.

लसूनाचा खाण्यात वापर करा

नाष्ट्यात लासूनचा वापर केला तर त्यामुळे तुम्ही शुगर आणि बीपी सारख्या आजारांपासून दूर राहू शकता. उपाशीपोटी लसूण खाल्ल्यास ब्लड शुगर आणि बीपी कंट्रोल मध्ये ठेवता येते. लसूण फुप्फूसांसंबंधी आजारांवर उपयुक्त ठरते.

तुळशीचे पानांचा करा वापर

तुळस आपल्या सर्वांच्या घरी असते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळस तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच तुमचं ब्लड प्रेशर आणि ग्लुकोज देखील कंट्रोल मध्ये ठेवण्यास मदत करते. तुळशीचे पांन रात्री एक ग्लास पाण्यात टाकून ठेवा आणि सकाळी उठून ते पाणी प्या. तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढेल.