पावसाळयात ‘या’ 5 गोष्टी तुमच्या आहारात करा सामील, रहाल ‘निरोगी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशाच्या अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. मान्सून उष्णतेपासून मुक्तता करतो पण सोबत बरेच आजारही आणतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला किंवा विषाणूजन्य ताप सामान्य आहे, परंतु कोरोना काळात हा व्हायरल तुम्हाला त्रास देऊ शकतो. म्हणूनच, पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी आपल्या आहाराद्वारे देखील घ्यावी. आपण आपल्या खाद्यपदार्थात छोटे-छोटे बदल करुन तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवून हा व्हायरल टाळू शकता. पावसाळ्यात आपण आपला आहार कसा ठेवावा हे जाणून घेऊया.

आहारात आले-लसूण घ्या

आले आणि लसूण सर्व मोसमात आरोग्यासाठी चांगले मानले गेले असले तरी, पावसाळ्यात त्यांचे सेवन केल्यास अनेक आजारांना आपण रोखू शकतो. लसूण संक्रमणाविरूद्ध लढण्यासाठी, सूज कमी करण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी औषध म्हणून काम करतो.

पालक

आपल्या आहारात पालकासारख्या पालेभाजीचा समावेश करा. पालकामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि ए असते. पालकाचे नियमित सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि ती व्यक्ती लवकर आजारी पडत नाही.

मीठाचे सेवन कमी करा

पावसाळ्यात जास्त तळलेल्या गोष्टी टाळा. तळलेल्या पदार्थांमध्ये मीठ असल्यामुळे त्याने आपल्या रक्तातील सोडियमचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे व्यक्तीला उच्च रक्तदाबाची समस्या होते. याशिवाय पावसाळ्यात मिठाचे जास्त सेवन केल्याने शरीरात पाण्याचा अभाव आणि सूज येण्याची समस्या देखील उद्भवू शकते.

लिंबू

पावसाळ्यात उन्हापासून आराम मिळण्यासाठी लिंबाचा रस प्या. जास्तीत जास्त व्हिटॅमिनयुक्त लिंबू खा. लिंबू संक्रमणापासून वाचवतात आणि शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढवतात.

हळद

हळदमध्ये एंटीसेप्टिक आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात. जर हळद दुधात मिसळून प्यायली तर त्याने शरीराला खूप फायदा होतो. हळद पचनक्रिया सुधारते तसेच साखर नियंत्रित करते. हळद आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते, ज्यामुळे आपण रोगांचा पराभव करू शकता. हळद तुमची स्मरणशक्ती तीव्र करते, तसेच तुमचा मूड सुधारते.

होममेड हर्बल टी प्या

पावसाळ्यात आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपल्या आहारात हर्बल टी किंवा काढ्याचा समावेश करा. यासाठी हळद, तुळस, आले, लसूण, दालचिनी, काळे मीठ पाण्यात घालून उकळवा. आता त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळा. या हर्बल टी मुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि रोगांविरूद्ध लढण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.

टिप :  स्टोरीमधील टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्यानुसार हे घेऊ नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like