कोरोना काळात निरोगी राहण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचा तुमच्या आहारात करा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात आरोग्य ही लोकांसाठी प्राथमिक गोष्ट आहे. त्यामुळे लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ लागले आहेत. डॉक्टर्सही निरोगी राहण्यासाठी योग्य दिनचर्या, योग्य खाणेपिणे आणि रोज व्यायाम करण्याचा सल्ला देतात. यासोबत ताणतणाव आणि नैराश्यापासून दूर राहण्यासाठी सांगतात. वयोवृद्ध लोकांना निरोगी राहण्यासाठी घरचे जेवण जेवण्याचा सल्ला दिला आहे. यात काही शंका नाही की निरोगी राहण्यासाठी कोणत्याही विशेष हेतूची गरज नाही. यासाठी डाएटमध्ये पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या अन्न पदार्थांचा समावेश केला पाहिजे. जर तुम्हाला माहिती नसेल तर, जाणून घेऊया-

दही
दह्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन आढळते. यासोबत यामध्ये चांगले बॅक्टीरिया असतात. याशिवाय, दह्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन बी२, व्हिटॅमिन बी१२, पोटॅशियम, मँगनेशियम हे गुणधर्म आढळतात. हे सहज घरी तयार केले जाऊ शकते. रोज दह्याचे सेवन केले पाहिजे, त्यामुळे पचन यंत्र मजबूत होते. याशिवाय ताणतणाव आणि जुन्या आजारांचा धोका कमी होतो.

डाळ
डाळीला पोषक तत्वांचे ‘पावर हाऊस’ असे म्हंटले जाते. डाळीच्या प्रत्येक दाण्यात पोषक तत्वे असतात. याच्या सेवनामुळे शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त होते. यामध्ये प्रोटीन आणि फायबर आढळतात, जे पचन यंत्राला स्वस्थ आणि मजबूत करण्यास मदत करतात. यासोबत नवीन सेल्सची निर्मिती करतात. डाळीमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, मॅगनेशियम, आयर्न आणि झिंक आढळतात.

बाजरी
नेहमी लोक भाकरी आणि भातावर जास्त लक्ष देतात. तर बाजरीला विसरून जातात. बाजरी ग्लूटेन फ्री असते, जे गहू आणि नाचणीपेक्षा जास्त हेल्दी असते. यामध्ये डायटरी फायबर उपलब्ध असतात. यासोबत बाजरी प्रोबायोटिकसाठी ओळखले जाते. यामुळे कब्ज, कोलन आणि कॅन्सरमध्ये आराम मिळतो. यासोबत यातील फायबर वजन कमी करण्यास मदत करते.

मसाले
भारत मसाल्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात. यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ऑक्सिडंट हे गुण आढळतात. मसाल्यांमुळे सूज आल्यास आराम मिळतो, रोग प्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि अनेक घातक आजारांमध्ये आराम मिळतो. हळद, दालचिनी, मेथी, मिरी या मसाल्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये मसाल्यांचा समावेश करा.

लसूण
आयुर्वेदामध्ये लसुणचा वापर औषधी स्वरूपात केला जातो. यामध्ये अनेक औषधी गुण उपलब्ध असतात, जे आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी फायदेशीर असतात. खासकरून थंडीमध्ये लसूणच्या सेवनाने सर्दी, खोकला आणि ताप या आजारात आराम मिळतो. यामध्ये असलेल्या गंधामुळे याची चव तिखट असते.

टीप :- या लेखात असलेल्या टिप्स आणि उपाय सामान्य माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यांना डॉक्टर अथवा मेडिकल प्रोफेशनलचा सल्ला घेऊन घ्या. आजार अथवा संक्रमणाची लक्षणे दिसल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.