कोरोना काळात इम्यून सिस्टम मजबूत करण्यासाठी रोज खा टोफू, ‘हे’ 9 जबरदस्त फायदे; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सोयाबीनला सुपरफूड म्हटले जाते. यामध्ये प्रोटीन, अमिनो अ‍ॅसिडशिवाय व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळते. सोबतच व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ई ची मात्रा जास्त असते. तसेच सोयाबीनमध्ये आयसोफ्लेवॉन्स नावाचे गुणकारी तत्व आढळते. सोयाबीन प्रोटीनचा मुख्य स्त्रोत आहे. यामध्ये प्रोटीन 40 टक्के पर्यंत असते. याशिवाय, सोयाबीनपासून दूध सुद्धा तयार होते. या दूधाला विरजण लावून दही बनवले जाते आणि दही पनीर प्रमाणे तुकडे करून आणि दाब देऊन टोफू बनवले जाते. टोफूचा शोध चीनमध्ये लागला आहे. यास बीन कर्ड (बीन दही) सुद्धा म्हटले जाते. टोफू चवीला गोड असते. पनीरच्या तुलनेत टोफूमध्ये कॅलरी खुप कमी असते. हे पनीर प्रमाणे भाजी टाकून बनवले जाते. टोफूला फ्राय करून स्नॅक्समध्ये वापरले जाऊ शकते. जाणून घेवूयात फायदे –

हे आहेत टोफूचे फायदे
1 हाडे आणि मसल्स मजबूत होतात.
2 हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते. हृदयरोगांचा धोका कमी होतो.
3 तज्ज्ञांनुसार, टोफूच्या सेवनाने वजन कमी करण्यात मदत होते.
4 मायग्रेनचा धोका सुद्धा कमी होतो.
5 ब्लड शुगर सामान्य ठेवते आणि डायबिटीजमध्ये आराम मिळतो.
6 प्रोस्टेट कॅन्सरला रोखण्यात मदत होते.
7 हे किडनीच्या आजारात लाभदायक आहे.
8 टोफूच्या सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होते. कोरोना काळात याचे सेवन करावे.
9 महिलांना यामुळे सायकिलिंग मेनोपॉजमध्ये आराम मिळतो.

* अ‍ॅलर्जीचा धोका असेल तर टोफूचे सेवन करू नये.