Covid-19 and Coconut Water : कोविडच्या रूग्णांसाठी कशाप्रकारे लाभदायक आहे नारळपाणी, जाणून घ्या 4 फायदे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना काळात इम्युनिटी चांगली असणे आवश्यक आहे. कोराना संक्रमित व्यक्तीला सुद्धा अतिशय थकवा आणि कमजोरी जाणावते. अशावेळी नारळपाणी तब्येत सुधारण्यासाठी आवश्यक ठरते. तसेच नारळपाणी इम्युनिटी वाढवते, लीव्हर हेल्दी ठेवते. यातील अँटी-ऑक्सीडेंट गुण शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. नारळपाणी पिण्याचे किती फायदे आहेत ते जाणून घेवूयात…

1 इम्यूनिटी वाढते :
एका नारळात सुमारे 600 मिलिग्रॅम पोटेशियम असते जे इम्युनिटी मजबूत बनवते. कोविड रूग्णांनी नारळपाणी प्यावे.

2 ब्लड प्रेशर नियंत्रित राहते :
पोटॅशियम भरपूर असल्याने दिवसात दोन वेळा नारळपाणी प्यायल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकते.

3 हृदयाचे रक्षण करते :
नारळपाणी ट्राय-ग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यात उपयोगी आहे. हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकमुळे व्यक्तीचा जीव जाण्याचा धोका दूर होऊ शकतो.

4 पचन ठीक होते :
कोरोनाच्या लक्षणांमध्ये उलटी आणि अतिसारचा समावेश झाला आहे. अशावेळी नारळपाणी अतिशय उपयोगी ठरते. याच्या सेवनाने उलटी, लूज मोशन, पोटात जळजळ, अल्सर आणि आतड्यांची सूज यासारख्या समस्या दूर होतात.