Health Insurance पॉलिसीची निवड करताना नेहमी लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी; होईल फायदा

पोलीसनामा ऑनलाइन टीम (Policenama online) – सध्याच्या काळात प्रत्येकासाठी हेल्थ इन्श्युरन्स (Health Insurance) घेणे खुप आवश्यक झाले आहे. नवीन ग्राहकांसाठी एक योग्य इन्श्युरन्स पॉलिसी निवडणे खुप महत्वाचे असते. बाजारात सर्वे करून आणि आपल्या आवश्यकता पाहता Health Insurance ची निवड केली पाहिजे. हेल्थ इन्श्युरन्स घेताना कोणत्या 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेवूयात.

1. कव्हर व्हावा सध्याचा आजार

ग्राहकाने आरोग्य विमा घेण्यापूर्वी हे जाणून घेतले पाहिजे की, पॉलिसीमध्ये सध्याचे आजार कवर होत आहेत किंवा नाही. नेहमी त्या विमा योजनेची निवड करणे चांगले असते, जी ग्राहकाचा सध्याचा आजार कव्हर करत असेल आणि ज्यामध्ये कमी वेटींग पिरियड असावा.

2. क्लेमची रक्कम

विमा पॉलिसीमध्ये गंभीर आजारांसाठी क्लेमची रक्कम जास्त असावी. बाजारात उपलब्ध अनेक विमा कंपन्यांच्या पॉलिसीजमध्ये काही गंभीर आजारांवर क्लेमची रक्कम अपेक्षेपेक्षा कमी असते. ग्राहकाला विमा पॉलिसी घेण्यापूर्वी याबाबत माहिती घेतली पाहिजे. यासाठी ग्राहकाला गंभीर आजारांच्या कव्हरसाठी लिस्टसह सर्व कागदपत्र काळजीपूर्वक वाचली पाहिजेत.

3. पेमेंटची मर्यादा

ग्राहकासाठी नेहमी अशी इन्श्युरन्स पॉलिसी निवडणे चांगले ठरू शकते, जी हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर पूर्ण खर्च कव्हर करेल. बाजारात उपलब्ध अनेक विमा कंपन्यांच्या पॉलिसीजमध्ये एका मर्यादेनंतर रूम किंवा आयसीयूचे पैसे पॉलिसीधारकालाच भरावे लागतात. यासाठी पॉलिसी घेण्यापूर्वी ग्राहकाने याबाबत जाणून घेतले पाहिजे.

4. प्रीमियमवर सूट

बाजारात उपलब्ध अनेक विमा पॉलिसीजमध्ये जास्तीत जास्त पॉलिसी टर्मवर एकरकमी प्रीमियम जमा केल्यास सूट देतात. पॉलिसी टर्म कमाल तीन वर्षांची असू शकते. ग्राहक एकसोबत प्रीमियम जमा करून या सवलतीचा लाभ घेऊ शकतात.

5. को-पेमेंट क्लॉज

को-पेमेंट ती रक्कम असते, जी स्वत: पॉलिसीधारकाला विमित सेवांसाठी भरावी लागते.
ही रक्कम अगोदर ठरलेली असते.
सिनियर सिटीझन्ससाठी बाजारात उपलब्ध बहुतांश विमा पॉलिसीज को-पेमेन्टच्या शर्थीसोबतच येतात.
अशावेळी ग्राहकाने ती विमा पॉलिसी निवडली पाहिजे,
ज्यामध्ये त्यास कमीतकमी को-पमेंट द्वावे लागेल.
याशिवाय ग्राहक को-पमेन्टची अट हटवण्याचा पर्याय सुद्धा निवडू शकतो.
यासाठी ग्राहकाला अतिरिक्त प्रीमियम द्यावा लागतो.

Web Title :- 

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

India Coronavirus Cases | देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 41 हजार नवे रूग्ण; आतापर्यंत 37 कोटी 60 लाख लोकांना देण्यात आली व्हॅक्सीन

कोरोनाच्या संसर्गात वाढ ! जागतिक आरोग्य संघटनेने दिले तिसऱ्या लाटेचे संकेत