Health Insurance Claim Tips | हेल्थ इन्शुरन्स क्लेम करताना ‘या’ 9 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Health Insurance Claim Tips | हेल्थ इन्श्युरन्स (आरोग्य विमा) मेडिकल इमर्जन्सीमध्ये आपल्याला उपयोगी पडतो. यामुळे आर्थिक दबाव टाळता येतो. तसेच आरोग्यसंबंधी अचानक आलेल्या आर्थिक संकटाला तोंड देणे शक्य होते. अशी गरज निर्माण झाल्यानंतर ग्राहकाने विमा पॉलिसीसाठी दावा प्रक्रिया (क्लेम प्रोसेस) समजून घेणे आवश्यक आहे (Health Insurance Claim Tips). कोणत्या गोष्टी दावा प्रक्रियेदरम्यान लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेवूयात…

‘या’ गोष्टींमध्ये करू नका चूक :

1 – मेडिकल इमर्जन्सीनंतर आपली विमा कंपनी/ नियुक्त टीपीएला माहिती देणे आवश्यक असते जर हॉस्पिटलमध्ये दाखल होणे नियोजित असेल तर कॅशलेस उपचाराच्या योजनेसाठी अगाऊ कळवू शकता.

2- माहिती विमा कंपनी / टीपीएद्वारे दिलेल्या फोन नंबर, ईमेल, इसएमएस, अ‍ॅप्स आणि इतर प्लॅटफॉर्मवर देता येऊ शकते.

3- माहिती दिल्यानंतर एक क्लेम नंबर (दावा क्रमांक) मिळेल. हा नंबर तुमच्यासाठी भविष्यात क्लेम जमा करणे / चौकशी करण्याची महत्वाची लिंक आहे.

4- दावा प्रपत्र (क्लेम फॉर्म) योग्य माहितीसह पूर्णपणे भरणे आवश्यक आहे. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व प्रासंगिक तथ्य सांगणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पुरक माहिती दिली पाहिजे.

5- सर्व रिसिट आणि बिलांची मूळ प्रत (ओरिजनल कॉपी) जमा केली पाहिजे.
रेकॉर्डसाठी क्लेम फॉर्म आणि रिसिटची कॉपी घेऊन ठेवा.

6- सर्व मेडिकल चाचण्यांचे रिपोर्ट, सर्व सल्ल्यासंबंधी कागपत्रांची मूळ प्रत जमा करा.
जर या कागदपत्रांच्या दिर्घकालिन/ आवर्ती उपचारांसाठी आवश्यकता असेल तर विमाकर्त्याकडून ते परत देण्याची विनंती करता येऊ शकते.

7- पॉलिसी कागदपत्रांमध्ये उल्लेख असलेल्या दावा प्रक्रियेचे नेहमी पालन केले पाहिजे.

8- क्लेम फॉर्म आणि कागदपत्र योग्य ठिकाणी जमा केले पाहिजेत. जर पॉलिसीची सेवा टीपीएच्या माध्यमातून केली जात असेल तर कागदपत्र टीपीएकडे जमा करा.
अन्यथा प्रत्यक्ष सेवेच्या बाबतीत विमा कंपनीच्या संबंधीत कार्यालयात जमा करा.
अनेक बाबतीत विमा एजंट/ब्रोकर कागदपत्र जमवणे आणि जमा करण्यासाठी मदत करतात.

9- बहुतांश विमा कंपन्या दाव्याची रक्कम पाठवण्यात सहजतेसाठी ओळखीचा पुरावा, केवायसी कागदपत्र आणि बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव/ISF कोड) मागतात.
काही प्रकरणात रद्द केलेला चेक (कॅन्सल्ड चेक) सुद्धा मागितला जातो.

 

 

या गोष्टी टाळा :

दाव्याची माहिती देण्यास उशीर.

क्लेम फॉर्ममध्ये चूक, अपूर्ण आणि संभ्रम निर्माण करणारी माहिती देणे.

एखाद्या तिसर्‍या व्यक्तीच्या मार्फत क्लेम फॉर्म जमा करणे, जे विमा कंपनीद्वारे मान्य नाही.

क्लेम फॉर्ममधील महत्वाच्या जागा रिकाम्या सोडणे.

थोडी दूरदृष्टी आणि योजनेतून हेल्थ इन्श्युरन्सचा दावा करणे सापे आणि सहज होऊ शकते.
उपयुक्त पावलांनुसार निश्चित प्रमारे क्लेम ताबडतोब प्रोसेस करण्यात विमाकर्त्याची मदत मिळू शकते. यामुळे गरजेच्या वेळी जलद पैसे मिळतात. (Health Insurance Claim Tips)

 

Web Title : Health Insurance Claim Tips | what are the important things to be kept in mind while making a health insurance claim understand in detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IAS-IPS | अवघ्या 75 कुटुंबाच्या ‘या’ गावात प्रत्येक घरात एक IAS किंवा IPS अधिकारी, जाणून घ्या विशेष गावाबद्दल

Satara Black Magic Case | ‘ती’ मुलगी बालसुधारगृहात ! स्मशानात अघोरी पूजा करणाऱ्या 6 जणांना पुण्यातून अटक