Coronavirus : ‘कोरोना’साठी देशातील पहिला विम्याचा प्लॅन लॉन्च, 499 रूपयांमध्ये मिळणार संपूर्ण उपचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून भारत देखील या रोगाने शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर क्लिनिक हेल्थकेअरने कोविड-19 ची पहिली सर्वमावेशक संरक्षण योजना सुरु केली आहे. भारतातील ही पहिलाच योजना आहे. या विम्यामुळे कोरोनाग्रस्त आणि त्याच्या कुटुंबीयांना मदत मिळणार आहे. ही योजना ग्राहकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या आरोग्या संबंधी आवश्यक असलेले उपचार मिळावेत त्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे. ही योजना 499 रुपयांपासून सुरू होत असून कंपनीच्या वेबसाईटवरून खरेदी करता येणार आहे.

काय आहे या योजनेत ?
या योजनेमध्ये प्राथमिक काळजी आणि आर्थिक सुरक्षा दोन्हींचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत विमा धारकाला पूर्ण उपचार मिळणार आहेतच शिवाय डॉक्टरांचा सल्ला, 24 x 7 डॉक्टरांची मदत आणि कोरोना व्हायरस संबंधित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर 1 लाख रुपयापर्यंतचे विमा कवच या योजनेत मिळणार आहे. या योजनेमुळे व्यवसाय आणि कार्पोरेटमधील कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

स्वस्त दरात योजना उपलब्ध
जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या दोन लाखापेक्षा अधिक झाली आहे. या व्हायरसमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन विमा योजना या रोगासाठी विमा धारकाला अत्यल्प दरात आर्थिक सुरक्षा देणार आहे. या योजनेसाठी वर्षाला 499 रुपये भरावे लागणार आहेत.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली
देशात करोना रुग्णांची संख्या वढत असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात 47, आंध्र प्रेदश 2, दिल्ली 10, हरियाणा 17, कर्नाटक 14, केरळ 27, पंजाब 2, राजस्थान 7, तमिळनाडू 1, तेलंगणा 13, जम्मू-काश्मीर 1, लद्दाख -8, उत्तर प्रदेश 17, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.