Health Insurance | हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर ‘या’ कारणामुळे क्लेम देण्यास नकार देऊ शकते इन्श्युरन्स कंपनी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना महामारीमुळे (Corona Epidemic) देशात हेल्थ इन्श्युरन्सचे (Health Insurance) महत्त्व लक्षणीय वाढले आहे. हेल्थ इन्श्युरन्स तुम्हाला कोणत्याही मोठ्या आजारापासून आणि अचानक हॉस्पिटलायझेशनच्या (Hospitalization) खर्चापासून संरक्षण देतो. म्हणूनच, हेल्थ इन्श्युरन्स (Health Insurance) घेतल्यानंतर, तुम्ही त्याचा लाभ घेताना काही माहितीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, अन्यथा हेल्थ इन्श्युरन्स कंपनी (Health Insurance Company) तुम्हाला क्लेम देण्यास नकार देऊ शकते.

 

हेल्थ इन्श्युरन्स कंपनी कोणत्या कारणांसाठी क्लेम नाकारू शकते ते जाणून घेवूयात (Why Your Health Insurance Can Be Denied)…

 

1. सक्रिय उपचार (Actively Treated) :
हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये (Health Insurance Policy) क्लेम करण्याची सर्वात मोठी अट ही आहे की तुमच्यावर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिका सक्रियपणे उपचार केला जात असावा. हे अनेकदा हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसींमध्ये बहुतांश वेळा सक्रियपणे उपचार केले (Actively Treated) जात आहेत असे म्हटले जाते.

 

उदाहरणार्थ, जर तुम्ही काही कारणास्तव हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटायला गेलात आणि डॉक्टरांनी तुम्हाला फक्त देखरेखीसाठी एक दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले तर या प्रकरणात विमा कंपनी (Insurance company) तुम्हाला क्लेम (Claim) देण्यास नकार देऊ शकते कारण तुम्ही केवळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली होतात आणि तिथे तुमच्यावर उपचार केले जात नव्हते.

 

2. जुने आजार (Pre-existing Diseases) :
जर तुम्हाला हा ब्लड प्रेशर, मधुमेह इत्यादी आजार असतील तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून विमा संरक्षण मिळणार नाही. या आजारांना विम्यात कव्हर करण्यासाठी वेगवेगळ्या विमा कंपन्यांनुसार 12 ते 48 महिन्यांचा कालावधी लागू शकतात. जर यापूर्वी तुम्ही रुग्णालयात दाखल असाल तर तुम्हाला विमा संरक्षण मिळणार नाही.

3. विविध खर्च (Miscellaneous Fees) :
आयसीआयसी लॉम्बार्डच्या (ICICI Lombard) वेबसाइटनुसार, विमा कंपन्या नोंदणी शुल्क, प्रवेश शुल्क आणि सेवा शुल्क इत्यादी भरत नाहीत.

 

4. हेल्थ सप्लीमेंट (Health Supplements) :
जर एखाद्या व्यक्तीद्वारे हेल्थ टॉनिक (Health Tonic) आणि प्रोटीन शेकचे (Protein Shake) सेवन आजाराचा सामना करण्यासाठी केले जात नसेल, तर त्याचे पैसे देखील विमा कंपनी देत नाही. याशिवाय कोणतेही हेल्थ टॉनिक आणि प्रोटीन शेक डॉक्टरांनी लिहून दिल्यास त्याचा इन्श्युरन्स क्लेममध्ये (Insurance Claim) समावेश केला जाईल.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Insurance | health insurance claim after hospitalization insurance company can refuse the claim for this reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rupa Dutta Arrested | पॉकेटमारीच्या आरोपावरून अभिनेत्री रूपा दत्ताला अटक, पर्समधून मिळाली तब्बल ‘इतकी’ चोरीची रक्कम

 

EPFO नंतर कोणत्या Saving Schemes मध्ये मिळते सर्वात जास्त व्याज, जाणून घ्या

 

Jaipur Crime | एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे चोरांच्या ‘कंपनी’त महिन्याला 30 हजार पगार; इंसेंटिव्हचीही सुविधा, पोलिसही गेले चक्रावून