Health Insurance | मोठा निर्णय! आता हेल्थ इन्श्युरन्ससाठी नाही वयाचे बंधन, आजारी व्यक्तीही घेऊ शकतात विमा, 65 वर्षांची वयोमर्यादा हटवली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – IRDAI New Rules | IRDAI ने आरोग्य विम्याबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. यासाठी असणारी ६५ वर्षांची वयोमर्यादा हटवली आहे. आता कोणत्याही वयात विमा घेता येईल. याशिवाय आजारी व्यक्ती देखील आरोग्य विमा घेऊ शकणार आहे. यामुळे ज्येष्ठांना वैद्यकीय उपचारात मदत मिळू शकणार आहे.

IRDA ने हे महत्वाचे निर्णय घेतल्याने सर्वांनाच आरोग्य सेवा प्रणालीचा लाभ घेणे सोपे जाईल आणि कोणीही आरोग्य विमा (Health Insurance) योजना खरेदी करता येईल. कोणत्याही वयोगटात अचानक येणारा आरोग्यावरील खर्चाची चिंता दूर होणार आहे.

यापूर्वी आरोग्य विमा केवळ ६५ वर्षाच्या आतील लोकांसाठी मिळत होता. हा नियम हटवला असून नवीन नियम १ एप्रिलपासून लागू झाला आहे. तसेच यापूर्वी आजारी व्यक्तींना आरोग्य विम्याचा लाभ मिळत नव्हता, अथवा त्यामध्ये अडचणी येत होत्या. आता आजारी असलेल्या व्यक्तींना सुद्धा आरोग्य विम्याचा लाभ मिळेल.(Health Insurance)

याबाबत IRDA ने अधिसूचन जारी केली आहे. यामध्ये नमूद केले आहे की, विमा कंपन्यांना आता अशी आरोग्य विमा उत्पादने बनवावी लागतील जी सर्व वयोगटातील लोकांना लागू होतील. याशिवाय कंपन्यांना ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मुले आणि मातृत्व लक्षात घेऊन उत्पादने आणावी लागणार आहेत.

या अधिसूचनेत पुढे म्हटले आहे की, कंपन्यांना आधीच कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनुसार विमा पॉलिसी आणाव्या लागतील.
कॅन्सर, हृदय, किडनीची समस्या आणि एड्स सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना आरोग्य विमा देण्यास कंपन्या
नकार देऊ शकणार नाहीत. याशिवाय, पॉलिसी घेणाऱ्याला प्रीमियम भरण्यासाठी हप्त्याचा पर्यायही दिला जाऊ शकतो.

IRDA च्या अधिसुचनेनुसार, सामान्य आणि आरोग्य विमा प्रदान करणाऱ्या कंपन्या आता ट्रॅव्हल पॉलिसी देखील देऊ शकतील.
तसेच आयुष उपचारांच्या कव्हरेजवर कोणतीही मर्यादा असणार नाही. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी,
सिद्ध आणि होमिओपॅथीमध्ये कोणत्याही कॅपशिवाय विम्याच्या रकमेपर्यंत कव्हरेज उपलब्ध असेल.
याशिवाय, एकाधिक दाव्यांना देखील परवानगी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raviwar Peth Pune Fire | रविवार पेठ: भोरी आळी येथे दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण (Video)

Baramati Lok Sabha | भोर विधानसभा मतदारसंघातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश

Pune Crime Branch | पुणे : सराईत वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 3 गुन्हे उघडकीस

Lohegaon Pune Crime | पुणे : मैत्रिणीसोबत ठेवले संबंध, अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर केला व्हायरल

Baramati Lok Sabha | बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का? अजित पवार म्हणाले, 7 मे पर्यंत भावनिक…