Health Insurance Reimbursement Claim | कसा दाखल करावा आरोग्य विमा प्रतिपूर्ती दावा, जाणून घ्या पूर्ण पद्धत

नवी दिल्ली : Health Insurance Reimbursement Claim | जेव्हा एखाद्या मेडिकल इमर्जन्सीमुळे क्लेमची स्थिती निर्माण होते, तेव्हा पॉलिसी होल्डरला हे पहावे लागते की, हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा आहे किंवा नाही. जर नसेल, तर हॉस्पिटलच्या बिलांचे पेमेंट केल्यानंतर क्लेमचा दावा करावा लागेल. अखेर हेल्थ इन्श्युरन्स कसा दाखल करू शकता तसेच कोण-कोणत्या प्रोसेसमधून (Health Insurance Reimbursement Claim) जावे लागते ते जाणून घेवूयात…

हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी किंवा नंतर

जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होण्याचा विचार करत असता तेव्हा अ‍ॅडव्हान्स क्लेमची माहिती द्यावी लागेल. इमर्जन्सीमध्ये टीपीए किंवा विमा कंपनीला ताबडतोब माहिती दिली पाहिजे.

हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या दरम्यान

हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या संबंधीत सर्व कागदपत्र ठराविक पद्धतीने प्राप्त करावी लागतील. हॉस्पिटल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जसे काही डॉक्युमेंट्सची आवश्यकता असू शकते. तुम्हाला रिइम्बर्समेंट क्लेम फॉर्म भरावा लागेल.

डिस्चार्ज नंतरच्या फॉर्मलिटीज

डिस्चार्ज झाल्यानंतर, क्लेम 15 दिवसांच्या आत (किंवा ठरल्याप्रमाणे) सादर केला पाहिजे. दावा
डॉक्युमेंट्स सर्व क्लेम संबधित डॉक्युमेंट्स सपोर्टिव्ह असावेत. अकाऊंटचा पुरावा म्हणून एक
कॅन्सल्ड चेकसुद्धा जमा करावा लागेल. जिथे रिइम्बर्समेंट क्लेमची अमाऊंट जमा होईल.

सबमिशन आणि प्रोसेस

एकदा निर्धारित आराखड्यात टीपीए/विमा कंपनी कार्यालयात क्लेम डॉक्सुमेंट्स जमा केल्यानंतर,
विमाकर्ता क्लेमच्या अप्रूव्हलसाठी कागदपत्रे आणि रिपोर्टचे व्हेरिफिकेशन करेल. क्लेम प्रमाणित
करण्यासाठी आणि आणखी जास्त डॉक्युमेंट्स आणि इन्फॉर्मेशनची मागणी केली जाऊ शकते.

पडताळणीनंतर क्लेम पूर्णपणे/आंशिक प्रकारे स्वीकार किंवा अस्वीकार केला जाऊ शकतो आणि याबाबत पॉलिसी होल्डरला कळवले जाऊ शकते.

हे लक्षात ठेवा

– पॉलिसी डॉक्सुमेंट्समध्ये असलेले क्लेम क्लॉज व्यवस्थित जाणून घेतले पाहिजेत. जेणेकरून सर्व डॉक्युमेंट्ससह एक व्हॅलिड रिइम्बर्समेंट क्लेम करता येईल.

– जर सर्व ओरिजनल बिल आणि मेडिकल पेपर क्लेम डॉक्युमेंट्ससोबत जमा केल्यास पॉलिसी होल्डर्सने रेकॉर्डसाठी जमा केलेल्या कागदपत्रांची एक-एक कॉपी आपल्याकडे ठेवली पाहिजे.

हे देखील वाचा

SIP Mutual Funds | 17500 रुपये गुंतवून तुम्ही सुद्धा बनू शकता 5 कोटीचे मालक, जाणून घ्या कसे

Nitin Landge Bribe Case | PCMC स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगेंना ‘या’ तारखेपर्यंत अंतरिम जामीन, लांडगेंच्या PA सह इतर चौघांबाबत कोर्टानं दिला ‘हा’ निर्णय

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Health Insurance Reimbursement Claim | how to file health insurance reimbursement claim know complete method here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update