342 रुपयांना मिळणार ‘ट्रिपल इन्शुरन्स कव्हर’, जाणून घ्या मोदी सरकारच्या ‘या’ विमा योजनेचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आज प्रत्येकाने आरोग्य विमा करणे आवश्यक आहे. म्हणूनच मोदी सरकारने एक खास विमा योजना सुरू केली असून त्यात केवळ 12 रुपये खर्च करावा लागतो. मोदी सरकारची विशेष योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) मध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दोन नव्हे तर 3 विमा संरक्षण मिळतील. या दोन्ही विमा संरक्षणामध्ये अपघाती मृत्यू कव्हर (Accidental Death Cover), अपंगत्व कव्हर (Disability Cover) आणि लाइफ कव्हर (Life Cover) असेल. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत तुम्हाला अपघात व अपंगत्व संरक्षण मिळेल, त्यासाठी तुम्हाला केवळ 12 रुपये खर्च करावे लागतील.

त्याच वेळी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत तुम्हाला एकूण 330 रुपये खर्च करावे लागतील, ज्या अंतर्गत तुम्हाला जीवन विमा संरक्षण मिळेल. अशा प्रकारे, वर्षामध्ये एकदा 342 रुपये प्रीमियम जमा करून आपण एकूण 3 विमा संरक्षण मिळवू शकता.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

मोदी सरकारच्या या योजनेत 18 ते 70 वर्षे वयोगटातील लोकांना अपघाती मृत्यू विमा आणि अपंगत्व विमा संरक्षण मिळेल. यामध्ये कोणत्याही अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूवर अथवा अपंगत्वावर दावा केला जाऊ शकतो. हृदयविकाराचा झटका या योजनेत समाविष्ट केलेला नाही. अपघाती मृत्यूच्या निमित्ताने विमा रक्कम 2 लाख आणि अपंगत्व 1 लाख रुपयांवर दावा केला जाऊ शकतो.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

या विमा योजनेचा लाभ 18 ते 50 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती घेऊ शकते. यामध्ये 2 लाख रुपयांचे लाइफ कव्हर असेल. या योजनेंतर्गत कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यावर 2 लाख रुपयांचा दावा करता येतो. वर्षाच्या मध्यात या योजनेसाठी अर्ज केल्यावर, प्रीमियम अर्जाच्या तारखेच्या आधारे निश्चित केला जाईल.

– पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत जून, जुलै आणि ऑगस्टचे वार्षिक प्रीमियम 330 रुपये असेल.

– सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांसाठी 258 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल.

– डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीसाठी प्रीमियम 172 रुपये असेल आणि मार्च, एप्रिल आणि मे साठी त्याला वार्षिक 86 रुपये द्यावे लागतील.

– यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन घेऊ शकता.

– आपण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी एलआयसी (LIC) किंवा इतर विमा कंपनीकडे देखील अर्ज करू शकता.